yuti and state government | Sarkarnama

सरकारची प्रतिमा चांगली राखण्यासाठी मंत्री व राज्यमंत्र्यांच्या आणाभाका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्यामुळे सरकारच्या विरोधात कोणताही संदेश जनतेमध्ये जाणार नाही. याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. याबाबत मंत्रिगटाच्या खास बैठकीत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांनी आणाभाका घेतल्याचे मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले. राज्यातील पुर परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात मंत्रिगटाची बैठक बोलावली होती. 

या बैठकीत सांगली-कोल्हापूर-सातारा या जिल्हयांसह राज्यातील इतर ठिकाणी आलेल्या पुराबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात आलेल्या पुराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने 6 हजार 800 कोटी रुपये इतकी आर्थिक मदत केंद्राकडे मागितली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीवर मात करण्यासाठी सर्व मंत्र्यांनी एकदिलाने काम करावे. तसेच परस्परातील विसंवाद टाळावा. सरकारची प्रतिमा मलिन होईल. जनतेच्या मनात रोष निर्माण होईल, अशी विधाने करू नये, अशा सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. 

मंत्रिमंडळ बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे सर्व मंत्री, राज्यमंत्री अशा सर्वांना बोलावले होते. मागील कित्येक महिन्यांत मंत्रीगटाची बैठक बोलावली नव्हती. मात्र राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही मंत्रीगटाची बैठक बोलावली होती. एरवी राज्यमंत्र्यांना मंत्रीगटाच्या बैठकी व्यतिरिक्‍त मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहता येत नाही. राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी नाही. मात्र आज मंत्रिगटाची बैठक बोलावली असल्याने राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहता आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख