पुण्यातून 186 किलोमीटर सायकलवरून त्याने गाठले आपले गाव - Youtth Traveled by Cycle to Avoid Crowd | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातून 186 किलोमीटर सायकलवरून त्याने गाठले आपले गाव

शांताराम काळे
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी गेलेला विद्यार्थी अनिल मंडलिक याने एसटीने प्रवास न करता १८६ किलोमीटरचा प्रवास करून आपले गर्दनी गाव गाठले. घरी आल्यावर त्याने आपला गुदमरलेला श्वास सोडला

अकोले  : कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी गेलेला विद्यार्थी अनिल मंडलिक याने एसटीने प्रवास न करता १८६ किलोमीटरचा प्रवास करून आपले गर्दनी गाव गाठले. घरी आल्यावर त्याने आपला गुदमरलेला श्वास सोडला. अनिलच्या मामाच्या मुलाचे लग्न असल्यामुळे त्याला गर्दनी येथे येणे आवश्यक होते. एसटीतील गर्दी टाळण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला.

कोरोनाच्या धास्तीने पुण्यातून मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे, एसटीने प्रवास करीत आहेत. एसटीला असलेली गर्दी पाहून एसटीने प्रवास न करणाचा अनिल मंडलिक या विद्यार्थ्याने सायकलचा पर्याय निवडला. थेट सायकलवरून अकोले तालुक्यातील गर्दणी गावातील१८६ किलोमीटर अंतरावर असलेले घर गाठले आहे. पहिल्यांदाच सायकलवर घरी गेलेल्या अनिलला बारा तास लागले. 

याबाबत बोलताना मंडलिक म्हणाला, की या अगोदर मी कधीच एवढा मोठा सायकलवर प्रवास केला नव्हता. कोरोनामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करण्याचे टाळून सायकलचा प्रवास निवडला. दुपारी पुण्यात निघाल्यानंतर रात्री बारा बाजून दहा मिनिटांनी घरी पोहचलो. रत्याने मी काही ठिकाणी थोडा वेळ आराम करीत प्रवास पूर्ण केला, असे त्याने सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी तो पुणे येथे असतो. वडील सखाहारी व आई ताराबाई यांनी तो घरी पोहचताच त्याला आलिंगन देऊन त्याचे स्वागत केले. अनिलनेही त्यांच्या पाय पडून दर्शन घेतले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख