youth suicide for maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची पुरंदरमध्ये आत्महत्या

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

वाल्हे ::राज्यभर भडकलेल्या मराठा आंदोलनामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात आत्महत्येचे सत्र सुरु असून ते लोण आता पुरंदर तालुक्यात येवून पोहचले आहे. त्याचा पहिला बळी आज दौंडज (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीत भोरवाडी फाट्यानजीक दौंडज खिंड येथे पडला.

पिंगोरी (ता.पुरंदर) येथील दत्तात्रय शिंदे (वय 35) याने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना घडल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली. तहसीलदार सचिन गिरी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दत्तात्रय तुकाराम शिंदे (वय35) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन येत्या पाच ऑगस्टला जलसमाधी घेत आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार दत्तात्रय शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याचे कारण देत आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवत दौंडज खिंड येथे रेल्वेखाली स्वतःस झोकून देत आत्महत्या केली. शिंदे यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांनी दत्तात्रय शिंदे यांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदत देवून शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी करीत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.

यावेळी पुरंदर तालुक्याचे तहसिलदार सचिन गिरी व भोर पोलिस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर राज्यातील आत्महत्याग्रस्त आंदोलनकर्त्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीनुसार जास्तीत जास्त मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधुन मिळवून देतानाच परिवारातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचा अहवाल शासनास पाठवत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख