मराठवाड्याचा युवक साहेबांच्या मागे ठामपणे उभा: सतीश चव्हाण 

pawar chavan
pawar chavan

मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाचे आमदार, शिक्षणसंस्था आणि या विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत, खंदे समर्थक सतीश चव्हाण यांची सकाळ समूहाच्या 'महाराष्ट्र दौऱ्या'निमित्त संदीप काळे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत. 

तुमच्या काळामध्ये पदवीधर युवकांसाठी कोणते उपक्रम झाले? ज्याची नोंद घेतली पाहिजे ?

२००८साली आम्ही पदवीधर निवडणूक जिंकली, तेव्हापासून मराठवाड्यातील युवकांची बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न होता. एकेकाळी शेती करणारा हा वर्ग पाण्याच्या टंचाईमुळे तसेच वरच्या लोकांच्या अन्यायामुळे शेती सोडून शिक्षणाकडे वळला.परंतु शिक्षणानंतर पुढे काय ? हा प्रश्न त्यांच्या पूढे उभा राहिला यावर उपाय म्ह्णून शरद पवार यांनी मराठवाड्यमध्ये पहिल्यांदा बजाज ऑटो या कंपनीला येण्यास प्रवृत्त केलं. परिणामी  त्या कंपनीवर अवलंबून असणारे इतर उद्योगांची देखील भरभराट झाली. 

  त्यामुळेच आज औरंगाबादची भारताचं 'ऑटो हब ' म्हणून जी ओळखल आहे याचं संपूर्ण श्रेय हे आदरणीय शरद पवार यांना जातं. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला. वास्तविक पाहता औरंगाबादमधील ३ ते ४ लाख कुटुंबाची उपजिविका ही औरंगाबादच्या एम.आय.डी .सी. वर अवलंबून आहे. त्यामुळे  जेव्हा मी या मतदारसंघातून  निवडून आलो, तेव्हा मुंबई - पुण्याच्या १००० उद्योगांना मराठवाड्यात आणून 'नोकरी महोत्सव' चालू केला.

त्याचप्रमाणे 'नोकरी करता -करता शिक्षण' याची सुरुवात मराठवाड्यात अजित पवार आणि वळसे पाटील यांनी केली. रोजगारा बरोबरच मराठवाड्याच्या भौतिक सुविधांच्या प्रश्नावरही मी आवाज उठवला.


आर्थिक मंदीबद्दल तुमचं कायम आहे? 

अशी मंदी ७० वर्षांमध्ये कधी अली नव्हती असं अर्थक्षेत्रातील जाणकार सांगतात. आर्थिक मंदीची सुरुवात ही नोटाबंदीपासून झाली. आदरणीय मनमोहनसिंह यांनी भारत सरकारला सतर्क केलं होत की, तुम्ही फार मोठ्या मंदीकडे भारताला ढकलताय परंतु सरकारने ते ऐकलं नाही आणि त्यामुळेच सरकारच्या धोरणाचा चुकीचा परिणाम म्हणून ही मंदी कमी होत नाही. म्हणून सरकारने  ताबडतोब हस्तक्षेप करून लोकप्रिय घोषणांचा पाऊस न पडता जास्त रोजगार कसा उपलब्ध करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.


भाजपकडून तुम्हाला निमंत्रण आलं का? 

निमंत्रण सगळ्यांनाच दिलेलं दिसतंय, परंतु शरद पवारांचे विचार धर्मनिरपेक्ष आहेत त्यामुळेच मी दहावीनंतर अकरावीत म्हणजेच १९७७ साली साहेबांचा कार्यकर्ता झालो. तेव्हापासून आजपर्यंत पवार साहेबांना सोडून जाण्याचा विचार माझ्या मनाला शिवला नाही. त्याचे कारण म्हणजे भाजपमुळे भारत आज ज्या दिशेने चालला आहे त्यावरून १० ते १५ वर्षांनी आज पाकिस्तानची अतिधर्म वेडापायी जी अवस्था आहे, ती भारताची होऊ शकते असे काही विचारवंतांचे मत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com