हास्यास्पद इव्हेंटपेक्षा जे जिवावर उदार होवून लढताहेत त्यांचे पहा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज सकाळच्या व्हिडिओनंतरसोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वेगवेगळे मिम्स येत आहेत.
youth leader ravikant tupkar criticizes narendra modis video message 
youth leader ravikant tupkar criticizes narendra modis video message 

पुणे : "जिवावर उदार होऊन जे आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे कसलीही यंत्रणा नाही. कोरोना रुग्णांना वाचवायचे म्हटले तर व्हेंटिलेटर नाही. असं असताना थाळी वाजवा नंतर दिवे घालवा आणि मेणबत्ती लावा हा कार्यक्रम हास्यास्पद आहे," अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

त्यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की," कोरोनाशी लढताना डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय यांना पीपीई किट नाही. रुग्णांना व्हेंटिलेटर नाही. पोलीसांना कुठलीही आरोग्य सुरक्षा नाही. गरीब उपाशी मरतो आहे...आणि आपण टाळ्या, थाळ्या वाजवूया व लाईट बंद करूया...पुन्हा एकदा इव्हेंट..! "

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज सकाळच्या व्हिडिओनंतर  सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वेगवेगळे मिम्स येत आहेत. "एवढे दिवस घरी बसलेल्या लोकांना मेणबत्ती आणायच्या निमित्ताने बाहेर पडण्याची संधी मिळाली." अशी खिल्ली नेटकऱ्यांकडून  उडवली जात आहे.

गेल्या वेळेस थाळी, टाळ्या वाजवा असे आवाहन मोदींनी केले होते मात्र तेव्हा ते आवाहन कोरोनाशी लढणाऱ्या घटकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होते. त्यामुळे त्यावर टीका झाली नव्हती. आता मात्र टीका सुरू झाली आहे. रविकांत तुपकर यांनी 'जे कर्मचारी उदार होऊन काम करत आहेत. त्यांना सुविधा द्या.'असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com