कोरेगाव-भिमा दंगलीत नुकसानभरपाई मिळालेल्या जयेश शिंदेंकडून मुख्यमंत्री निधीला एक लाखाचा धनादेश 

दंगलीनंतर केवळ आठच महिन्यात पंचनाम्यासह नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम थेट बॅंक खात्यात वर्ग केली गेल्यानेच आपले सरकारप्रती उत्तरदायित्व असल्याचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच सांगत जयेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हाती धनादेश सोपवला. शिंदे दिलेल्या या मदतनिधीमुळे फडणवीसांनीही शिंदेंची पाठ थोपटली.
कोरेगाव-भिमा दंगलीत नुकसानभरपाई मिळालेल्या जयेश शिंदेंकडून मुख्यमंत्री निधीला एक लाखाचा धनादेश 

शिक्रापूर : कोरेगाव-भिमा (ता.शिरूर,जि.पुणे) येथील दोन वर्षांपूर्वीच्या दंगलीत संपूर्ण चारचाकीचे शोरुम बेचिराख होवून उध्वस्त झालेल्या जयेश शिंदे या युवा उद्योजकाने या वर्षी तब्बल एक लाख ११ हजारांची आर्थिक मदत स्वत:हून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली.

दंगलीनंतर केवळ आठच महिन्यात पंचनाम्यासह नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम थेट बॅंक खात्यात वर्ग केली गेल्यानेच आपले सरकारप्रती उत्तरदायित्व असल्याचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच सांगत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हाती धनादेश सोपवला. शिंदे दिलेल्या या मदतनिधीमुळे फडणवीसांनीही शिंदेंची पाठ थोपटली. 

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भिमा (ता.शिरूर, जि.पुणे) येथील दंगल संपूर्ण राज्यभर नव्हे तर जागतिक स्तरावर गाजली. त्याची कारणे, त्या दंगलीसाठीचे दोषी आणि त्याची कारणमिमांसा सध्या न्यायालयिन प्रक्रीयेत असली तरी या दंगलीनंतर शासनाकडून कोरेगाव-भिमा येथील २९८ पंचनामे तातडीने करुन घेवून २२ सप्टेंबर २०१८ रोजी सर्व बाधितांना एकुण ७ कोटी ९८ लाख रुपयांची नुकसान भरपाई थेट बॅंक खात्यात वर्ग केली गेली. नुकसानभरपाई एवढ्या लवकर मिळण्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण असल्याची प्रतिक्रियाही या बाधितांकडून व्यक्त होत आहे. 

या दंगलीत जयेश शिंदे यांचे छत्रपती अ‍ॅटो हे चारचाकीचे शोरुम त्यातील सर्व स्वत:च्या व ग्राहकांच्या गाड्यांसह पूर्ण जळाले होते. विमनस्क अवस्थेत शिंदे सैरभैर झाले होते. अशा वेळी शिरुरचे भाजपा आमदार बाबुराव पाचर्णे व पुण्यातील माजी खासदार प्रदीप रावत यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा ठेवला व कोरेगाव-भिमाकरांची नुकसान भरपाई केवळ आठच महिन्यात मिळवून दिली. 

या संपूर्ण घटनाक्रमात सरकारने दाखविलेली सजगता आणि याच निमित्ताने मुख्यमंत्री सहायता निधीचे काम पाहून जयेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून थेट मुंबईत जावून त्यांना १ लाख ११ हजारांचा धनादेश नुकताच दिला. पर्यायाने उद्ध्वस्थाने पुन्हा उभारी घेवून उद्घ्वस्थांना पुन्हा उभे करण्यासाठीचे हे दान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भावले आणि त्यांनी यावेळी जयेश शिंदे यांची पाठ थोपटली. 

आमदार पाचर्णेंच्या पाठपुराव्यामुळेच..!
दंगलीनंतर मानसिक उभे राहण्यापासून ते नुकसानभरपाई मिळणे आणि सरकारप्रती उत्तरदायित्व म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला १ लाख ११ हजारांची रक्कम देणगी देण्यासाठी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे प्रोत्साहन मोठे राहिले. त्यांच्या मुळेच आपण व्यवसायातही पुन्हा उभे राहिलो आणि राजकारणातही आपल्या मुळ गावात विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथे उपसरपंच झाल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com