युवक काँग्रेसच्या आंदोलनात शरद पवार तुम आगे बढोची घोषणा ! - Youth congress workers give slogans promoting Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

युवक काँग्रेसच्या आंदोलनात शरद पवार तुम आगे बढोची घोषणा !

तुषार पाटील
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

भोकरदनमध्ये आंदोलन होते युवक काँग्रेसचे पण घोषणा होत्या ,शरद  पवार तुम आगे  बढो, अशा !

भोकरदन : भोकरदनमध्ये आंदोलन होते युवक काँग्रेसचे पण घोषणा होत्या ,शरद  पवार तुम आगे  बढो, अशा ! महाराष्ट्रात तरुण वर्गात आणि शेतकऱ्यांना शरद पवार यांची किती लोकप्रियता आहे हे या घोषणावरून स्पष्ट झाले . आंदोलक 'शरद पवार तुम आगे  बढो', 'राहुल गांधी तुम आगे बढो' अशा घोषणा देत होते . 

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भोकरदन-जाफ्राबादसह परिसरात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे या मागणीसाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. तहसिलदार यांच्या गाडीवर नुकसान झालेले मक्‍याचे कणसं टाकत आंदोलन करण्यात आले.

मका, कपाशी, ज्वारी, बाजरी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे.परंतु प्रशासनाने अद्याप कोणाच्याही बांधावर जाऊन पंचनामा केलेला नाही. या उलट शेतकऱ्यांना तालुक्‍याला येऊन ऑनलाईन फॉर्म भरणे व कागदपत्रे गोळा करण्यासाठी गोवोगावी दंवड्या दिल्या जात आहेत. याबद्दल संताप व्यक्त करत युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहूल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

वातानुकुलीत खोलीत बसुन शेतकऱ्यांना पायपीट करायला लावण्यापेक्षा प्रशासनानेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. राहूल देशमुख यांनी तहसिलदारांच्या गाडीवर चढून पावसाने नुकसान झालेल्या मकाची कणसं टाकली आणि प्रशासनाच्या बेफकरी वृत्तीचा निषेध केला. यावेळी राहुल गांधींबरोबरच शरद पवार आगे  बढो अशा  घोषणा देण्यात आल्या . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख