युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी सत्यजीत तांबेंना चार स्पर्धक? - Youth Congress Election Satyajeet Tambe | Politics Marathi News - Sarkarnama

युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी सत्यजीत तांबेंना चार स्पर्धक?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

युवक काँग्रेसचा निवडणुक कार्यक्रम घोषित झाला आहे. यामध्ये 9 ते 11 सप्टेबर दरम्यान राज्यभर मतदान होत आहे. राज्यात 2,47,041 मतदार आहेत. यामध्ये सर्वाधीक 34,528 मतदार नगर जिल्ह्यात आहेत. नागपुरला 25,500, नाशिकला 9,168 मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात प्रत्येक सक्रीय सदस्याला पाच मते देण्याचा अधिकार आहे.

नाशिक : युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रीया सुरु झाली आहे. गतवेळी आमदार विश्‍वजीत कदम यांच्याशी लढत दिलेले डॉ. सत्यजीत तांबे यंदा पुन्हा उमेदवारी करीत आहेत. त्यांना यंदा चार प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. मात्र सदस्य नोंदणीत त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे गृह जिल्हा नगरसह उत्तर महाराष्ट्रात अनुकुलता निर्माण झाल्यास त्यांचे परिश्रम कामी येऊ शकतात. त्यामुळे यंदा त्यांच्या समर्थकांना गोड बातमी मिळणार काय याची उत्सुकता आहे. 

युवक काँग्रेसचा निवडणुक कार्यक्रम घोषित झाला आहे. यामध्ये 9 ते 11 सप्टेबर दरम्यान राज्यभर मतदान होत आहे. राज्यात 2,47,041 मतदार आहेत. यामध्ये सर्वाधीक 34,528 मतदार नगर जिल्ह्यात आहेत. नागपुरला 25,500, नाशिकला 9,168 मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात प्रत्येक सक्रीय सदस्याला पाच मते देण्याचा अधिकार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस हे राज्यभर समान तर जिल्हानिहाय अध्यक्ष व सरचिटणीस यांना प्रत्येकी एक आणि तालुकानिहाय विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष असे पाच मते देण्याचा अधिकार आहे.

अध्यक्षपदासाठी डॉ. तांबे यांसह आमदार अमित झनक, कुनाल राऊत, समरहुर खान आणि निशा नागझोरे असे पाच उमेदवार आहेत. सरचिटणीसपदासाठी 105 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात नाशिकमधून भास्कर गुंजाळ हे एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत सध्या चैतन्य आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख