टॅबद्वारे होणार युवक कॉंग्रेसची निवडणूक  - youth congress election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

टॅबद्वारे होणार युवक कॉंग्रेसची निवडणूक 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (ता. 26) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही निवडणुक टॅबच्या माध्यमातून होणार आहे, अशी माहिती युवक कॉंग्रेसचे निरीक्षक आर्यन नेगी यांनी दिली. 

सातारा : युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (ता. 26) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही निवडणुक टॅबच्या माध्यमातून होणार आहे, अशी माहिती युवक कॉंग्रेसचे निरीक्षक आर्यन नेगी यांनी दिली. 

युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभरातून साडे तीन लाख सभासदांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे, असे सांगून श्री. नेगी म्हणाले, युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातून 19 हजार 234 सदस्य झाले आहेत. यामध्ये कऱ्हाड उत्तरमध्ये 3129, कऱ्हाड दक्षिणमधून 5421, कोरेगाव 1740, माण 2142, वाई 2071, फलटण 402, सातारा 133, पाटण 1196 सभासद झाले आहेत. 

ही प्रक्रिया मोबाईल टॅबच्या माध्यमातून होणार असून प्रत्येक सदस्य पाच मते देणार आहे. एकुण तीन दिवसांत ही मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून दोन विधानसभा मतदारसंघात एका दिवशी मतदान होईल. मतदानाची तारिख 29 ऑगस्टला बैठकीत निश्‍चित होईल. याची नोंदणी दिल्लीतील सर्व्हवर ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. या निवडणुकीतून युवकचा प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख