youth congress blackens PM poster | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

थेट पंतप्रधानांच्या पोस्टरला काळे फासले : काॅंग्रेसवाल्यांचे डोके भडकले

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई : दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असल्याने आज युवक कॉंग्रेसने आक्रमक आंदोलन करत सरकारचा निषेध केला. राज्यभरात पेट्रोल पंपावर युवक कॉंग्रेसने तीव्र आंदोलन केले. यामधे, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोलपंपावरील पंतप्रधानांच्या पोस्टरला काळे फासत निषेध केला. तर, काही ठिकाणी पेट्रोलपंपावर दगडफेक देखील करण्यात आली. 

मुंबई : दररोज पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत असल्याने आज युवक कॉंग्रेसने आक्रमक आंदोलन करत सरकारचा निषेध केला. राज्यभरात पेट्रोल पंपावर युवक कॉंग्रेसने तीव्र आंदोलन केले. यामधे, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोलपंपावरील पंतप्रधानांच्या पोस्टरला काळे फासत निषेध केला. तर, काही ठिकाणी पेट्रोलपंपावर दगडफेक देखील करण्यात आली. 

युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानतंर सत्यजित तांबे यांनी आक्रमक आंदोलन करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. वर्धा येथील राहूल गांधी यांच्या सभेच्या दरम्यान युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. तर, संपुर्ण नागपूर ते वर्धा रोडवर पंतप्रधानांच्या विरोधात भिंतीवर वादग्रस्त घोषणाही लिहल्या होत्या. 

आज संगमनेर येथील पेट्रोल पंपावरील आंदोलनात सहभागी होताना सत्यजित तांबे यांनी थेट नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेल्या पोस्टरलाच काळे फासले. याशिवाय, "मोदी तेरा खेल... सस्ती दारू, महेंगा तेल' अशी घोषणाबाजीही त्यांनी केली. युवक कॉंग्रेसच्या या आक्रमक आंदोलनाने आगामी काळात कॉंग्रेस विरूध्द भाजप असा राजकीय संघर्ष शिगेला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही काॅंग्रेसच्या नेत्यांनी असेच कृत्य केले होते. मोदी यांच्याविरोधात बडोदा लोकसभा मतदारसंघातून मधुसूदन मिस्त्री हे काॅंग्रेसकडून उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरायला जात असतानाच रस्त्यावरील खांबावर दिसणारे मोदी यांचे पोस्टर फाडण्याचा पराक्रम केला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख