युवक कॉंग्रेसने घेतली राज्यातील " सुपर-60' मतदारसंघांची जबाबदारी

युवक कॉंग्रेसने घेतली राज्यातील " सुपर-60' मतदारसंघांची जबाबदारी

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी कॉंग्रेसची यंग ब्रिगेड सज्ज झाली आहे. युवक कॉंग्रेसने राज्यातील 60 विधानसभा मतदारसंघांची निवड केली असून " सुपर-60' अतंर्गत या मतदारसंघातील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

या मतदारसंघातील बुथ कमिट्यांपासून तर सर्व प्रचार यंत्रणा युवक कॉंग्रेस राबवणार असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अख्खी कॉंग्रेस निष्प्रभ ठरली होती. आता कॉग्रेसमधील युवक काही करिशमा दाखवतात का ? याकडे सगळ्यांचा नजरा लागल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीतील पराभव विसरून आगामी विधानसभा निवडणुकीवर कॉंग्रेसने विशेषतः युवक कॉग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील 288 पैकी 60 मतदारसंघांची निवड करत येथील उमेदवारांना विजयी करण्याचा चंगच युवक कॉंग्रेसच्या टीमने बांधला आहे. या मोहिमेला "सुपर-60' असे नाव देण्यात आले आहे. येत्या जुलै मध्ये ऋतिक रोशनची भूमिका असलेला "सुपर-30' चित्रपट प्रदर्शित होत आहे. एका शिक्षकाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

या सुपर-30 पासून प्रेरणा घेत कॉंग्रेसने राज्यातील 60 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत "सुपर-60' चे ध्येय निश्‍चित केले आहे. खरं तर युवक कॉंग्रसे राज्यातील सगळ्याच मतदारसंघात काम करणार आहे. पण त्यातल्या सुपर-60 मतदारसंघावर ते अधिक भर देणार आहेत. निवडण्यात आलेल्या या 60 मतदारसंघाचा अभ्यास, पक्षाची सद्यस्थिती, बुथ कमिट्यांची स्थापना आणि युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बांधणी यावर बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. 

राज्यातील या सुपर-60 विधानसभा मतदारसंघांवर लक्ष ठेवण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेसच्या दिल्लीतील एका समन्वयकाची खास नियुक्ती देखील करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैला सुपर-60 मध्ये समावेश असलेल्या औरंगाबादमधील पश्‍चिम विधानसभा मतदारसंघासाठीची पहिली बैठक होणार आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्राच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com