धक्कादायक ! सलमान खानला मारण्यासाठी तुरुंगात कट.. - Sharpshooter Rahul was given the responsibility to kill Salman Khan | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक ! सलमान खानला मारण्यासाठी तुरुंगात कट..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

बिश्वोईच्या टोळीनं सलमान खानला मारण्यासाठी जबाबदारी शार्प शुटर राहुल याच्याकडं सोपविली होती.

फरिदाबाद : बॅालिवुड अभिनेता भाईजान सलमान खान यांच्या हत्येचा कट सराईत गुन्हेगार लॅारेंस विश्वाईच्या टोळीनं रचला होता, अशी माहिती उघडकीस आली आहे. एका व्यक्तीच्या गुन्हाच्या तपासात करीत असताना फरीदाबाद पोलिसांनी या टोळीचा शॅार्प शुटर राहुल उर्फे सांगा उर्फे सांगा उर्फे बाबा याला उत्तराखंड येथून अटक केली आहे. 

हरियाना, पंजाब, राजस्थान येथे कार्यरत असलेली लॅारेंस बिश्वोईच्या टोळीनं सलमान खानला मारण्यासाठी जबाबदारी शार्प शुटर राहुल याच्याकडं सोपविली होती. पण कोरोनामुळे लॅाकडाउन सुरू झाले अन् सलमान खान याला मारण्याचा कट फसला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. 

जानेवारी महिन्यात राहुल याने सलमान खान यांच्या मुंबई येथील वांद्रे येथील घराची पाहणी केली होती. फरीदाबाद पोलीस एका खूनाचा तपास करीत असताना त्यांनी राहुला अटक केली होती. त्यावेळी राहुल याने सलमान खान यांच्या खूनाच्या कट रचला असल्याची कबुली दिली आहे. 

काळवीट शिकार प्रकरणावरून लॉरेंस बिश्नोईने यापूर्वीही सलमान खान याला मारण्याची धमकी दिली होती. यासाठी जून 2018 मध्ये लॅारेंसने आपला साथीदार सराईत गुंड संपत नेहरा याला सलमानच्या मागावर पाठविलं होतं. सलमान खानवर काळवीटची शिकार केल्याच्या आरोप आहे. राजस्थानमधील बिश्र्वोई समाज काळवीटाची पूजा करतात. त्यामुळे सलमानविरोधात बिश्नोई समाजाने हा खटला दाखल केला आहे. तेव्हापासून बिश्नोईने सलमानला मारण्याचा कट रचला होता.

हेही वाचा : सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे..

 
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे. या प्रकरणाचं सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने सीबीआयला द्यावे, आदेशाचं पालनं करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. आमदार बबलू यांनी या प्रकरणातील साक्षीदारांची हत्या होऊ शकते, असा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील साक्षीदारांना धमकावण्यात येत आहे. त्यांची हत्या केली जाऊ शकते. मुंबई पोलीस मात्र, या साक्षीदारांना संरक्षण पुरवत नाहीत. ज्या प्रकारे सर्व घडामोडी घडत आहेत त्या पाहता साक्षीदारांची हत्या होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी साक्षीदारांना संरक्षण पुरवावे अशी आमची मागणी आहे. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख