Parth Pawar Took Separate line on Ram Mandir Than NCP | Sarkarnama

पार्थ पवारांची नेहमीच वेगळी लाईन!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि मावळ लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार पार्थ पवार यांनी जय श्रीराम लिहित पाठिंबादर्शक भूमिका घेतली आहे. या घटनेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केल्याने खळबळ उडाली

मुंबई : राममंदीर बांधल्याने कोरोना जाईल का, असा सवाल उपस्थित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या भूमीकेपेक्षा वेगळी भूमीका घेतली आहे. अयोध्येतील राम मंदीराला पार्थ पवार यांनी पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या वर्तुळात आता चर्चा सुरु  झाली आहे.

अयोध्येतील राम मंदिराबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि मावळ लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार पार्थ पवार यांनी जय श्रीराम लिहित पाठिंबादर्शक भूमिका घेतली आहे. या घटनेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केल्याने खळबळ उडाली. काल  दिवसभर या विषयाची चर्चा झाल्यानंतर सायंकाळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हे त्यांचे व्यक्तिगत मत असेल. त्या पत्रावर पक्षाचे चिन्ह नाही याकडे लक्ष वेधले. लोकशाहीत वेगळे मत व्यक्त करण्याची मुभा असते असे मतही त्यांनी लिहिले आहे.

या पूर्वीही पार्थ पवार यांनी पक्षाच्या भूमीकेपेक्षा वेगळी भूमीका घेतली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे मत पार्थ पवार यांनी व्यक्त केले होते. राज्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सरकार आहे. या सरकारचा सीबीआय चौकशीला विरोध आहे. असे असतानाही पार्थ पवार यांनी वेगळी भूमीका घेऊन सगळ्यांना आश्चर्यचकित केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी द्यायला शरद पवार उत्सुक नव्हते. मात्र, पार्थ पवार यांनी हट्टाने ही निवडणूक लढवली. अजित पवार यांनी सगळी ताकद लाऊनही पार्थ यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळीही पार्थ यांनी वेगळी भूमीका घेतल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा राम मंदीराला दिलेल्या पाठिंब्यावरुन पार्थ पवार नेहमीच वेगळी भूमीका घेतात, ही चर्चा सुरु झाली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख