BJP Mla Nitesh Rane Hits at Aditya Thackeray | Sarkarnama

नितेश राणे म्हणाले... अब बेबी पेंग्विन तो गयो!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. याबाबत नितेश राणे म्हणतात...अब बेबी पेंग्विन तो गयो! इट्स शो टाईम!

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या असून 'अब बेबी पेंग्विन तो गयो!' असे ट्विट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी युवा सेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून केले आहे. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे.या प्रकरणाचं सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने सीबीआयला द्यावे, आदेशाचं पालनं करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. याबाबत नितेश राणे म्हणतात...अब बेबी पेंग्विन तो गयो! इट्स शो टाईम!

दुसरीकडे, पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर पार्थ यांनी हे ट्विट केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु होणार आहे. 

हे देखिल वाचा - कुणी बांधले होते मुंबई पोलिसांचे हात - आशिष शेलार

''कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?," असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!  "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे.  पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही?  कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?,'' असेही प्रश्न शेलार यांनी व्यक्त केले आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख