सरकार येईल या आशेवर भाजप दररोज नवनवीन विषय समोर आणतेय.... - In the hope that the government will come, BJP is bringing up new issues every day .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

सरकार येईल या आशेवर भाजप दररोज नवनवीन विषय समोर आणतेय....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 जून 2021

सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : भाजप BJP दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून आज सरकार जाणार आहे... उद्या सरकार जाणार आहे, असे बोलत आहे परंतु हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी स्पष्ट केले आहे. In the hope that the government will come, BJP is bringing up new issues every day ....

महाविकास आघाडी सरकार जाणार... लवकरच कोसळणार ही भाजपने जाहीर केलेली एकही भविष्यवाणी किंवा तारीख खरी ठरत नाहीय, असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आले आहे. 

हेही वाचा : दोषी नसेल तर पुन्हा जबादारी द्या, माजी मंत्री संजय राठोड यांची मागणी..

सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

आवश्य वाचा : शिवसैनिकांना मान्य नसलेली युती सरनाईकांनी बोलून दाखवली!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख