you are like my son | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

`तू माह्या लेकासारखाच हायिस पोरा...`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

कॅन्टोन्मेंट : उमेदवार म्हणून एखाद्या वस्तीत मत मागण्यासाठी फिरत असताना एक ज्येष्ठ महिला समोर येते. आपल्या आईच्या वयाची महिला पाहून उमेदवार आपसूकच खाली वाकून तिच्या पायांना स्पर्श करतो आणि त्या माऊलीच्या तोंडूनही सहज उद्गार बाहेर पडतात... तू माह्या लेकासारखाच हायिस पोरा.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना शिंदे छत्री परिसरात प्रचारादरम्यान हा अनुभव आला. 

कॅन्टोन्मेंट : उमेदवार म्हणून एखाद्या वस्तीत मत मागण्यासाठी फिरत असताना एक ज्येष्ठ महिला समोर येते. आपल्या आईच्या वयाची महिला पाहून उमेदवार आपसूकच खाली वाकून तिच्या पायांना स्पर्श करतो आणि त्या माऊलीच्या तोंडूनही सहज उद्गार बाहेर पडतात... तू माह्या लेकासारखाच हायिस पोरा.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना शिंदे छत्री परिसरात प्रचारादरम्यान हा अनुभव आला. 

निवडणुकीसाठी मताचा जोगवा मागत दारोदार फिरणे हा पूर्णवेळ कार्यक्रम सध्या सर्व पक्षांच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. समाजातील विविध घटक, विविध समूह आणि नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचे काटेकोर प्रयत्न सुरू आहेत. परंतु या सगळ्या धामधुमीत असा हृद्य अनुभव उमेदवाराचे बळ दहापटींनी वाढवून जातो.

सुनील कांबळे यांची शिंदे छत्री परिसरात पदयात्रा सुरू होती. त्यावेळी ते समोर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हात जोडून नमस्कार करीत होते. काही महिला स्वतःहून पुढे येऊन त्यांना ओवाळणी करीत होत्या. सोबत पक्षाचे कार्यकर्तेही होते. अशी ही पदयात्रा वस्तीवस्तीतून पुढे सरकत होती. एका वस्तीतून जात असताना समोरून एक ज्येष्ठ महिला आली. आपल्या आईच्या वयाची महिला पाहून कांबळे यांनी आपसूकच तिच्या पायांना स्पर्श करून तिचे आशिर्वाद घेतले. तेव्हा त्या महिलेने सुनीलभाऊंना आशिर्वाद तर दिलेच पण त्यांच्या तोंडून सहजच शब्द निघाले, तू माह्या लेकासारखाच हायिस पोरा... हे उद्गार ऐकून सुनीलभाऊंसह सोबतचे कार्यकर्तेही गहिवरले.

शिंदे छत्री परिसरातील अनेक वस्त्या पिंजून काढण्यात आल्या. प्रत्येक घरातील नागरिकांसमोर हात जोडून त्यांना मत देण्याची विनंती करण्यात आली. या पदयात्रे दरम्यान महिला, ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम, सिंधी समाजाचे नागरिक यांचा कांबळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या पदयात्रेत सामान्य नागरिक स्वतःहून सामील होत आहेत. या परिसरातील अनेक समस्या गेल्या पाच वर्षांत सोडविल्या गेल्यामुळे तसेच अनेक नागरिकांना नव्या सुविधा व रोजगाराची साधने मिळाल्यामुळे त्यांचा कांबळे यांना खंबीर पाठिंबा लाभत आहे.

पदयात्रेत कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित, कोमल शेंडकर, संतोष इंदुरकर, नगरसेवक कालिंदी पुंडे, धनराज घोगरे, उमेश गायकवाड, दिनेश होले यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख