सत्यजीत तांबेंचा १०० दिवसांचा कृती कार्यक्रम युवकांना भावला

सत्यजीत तांबेंचा १०० दिवसांचा कृती कार्यक्रम युवकांना भावला

नगर : महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या शिर्डी येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षणात (युवा मंथन) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी 'मिशन विधानसभा : १०० दिवसांचा कृती कार्यक्रम' चे सादरीकरण केले. हा कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणुकीत काय जादू करणार, काँग्रेसला युवा मंथन शिबिर नवसंजीवनी कशी देणार, याबाबत युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसची झालेली वाताहत पाहता युवकांमध्ये नाराजीची भावना तयार झाली होती. ही मरगळ दूर करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यस्तरीय युवा मंथन शिबिर शिर्डीत घेतले होते. दोन दिवसीय झालेल्या शिबिरात आगामी विधानसभेची पेरणी केली. ती काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना भावली. त्यांचा आत्मविश्वास वाढला. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विचारवंतांचे मार्गदर्शन अनुभव त्यासाठी कामी आला.

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना फक्त प्रेरणा, प्रोत्साहन देणे एवढ्यापुरतेच लक्ष्य नव्हते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी काँग्रेसची विचारधारा नव्याने लोकांपर्यंत घेऊन जाणे, लोकांचे प्रश्न समजून घेऊन राज्यातील शिवसेना भाजप सरकारविरुद्ध निर्णायक लढाई लढण्यासाठी तयारी करणे, हा खरा उद्देश होता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी 'मिशन विधानसभा : १०० दिवसांचा कृती कार्यक्रम' चे सादरीकरण केले. यापूर्वी अशा पद्धतीने खास युवकांसाठी वेगळा जाहीरनामा कोणीच मांडला नव्हता. युवकांसाठी असलेला हा जाहीरनामा राज्यातील लाखो युवा कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू मानून तयार केला आहे. त्यामुळेच हा युवकांचा जाहीरनामा शिबिरासाठी राज्यभरातून आलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना चांगलाच भावला. 

काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी, माजी खासदार राजीव सातव, अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरु, ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रमुख नदीम जावेद, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही., प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार शिवम शंकरसिंग, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या राज्य प्रभारी प्रतिभा रघुवंशी, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार सुधीर तांबे यांनी केलेले मार्गदर्शन युवकांना भावले.

हार्दिक पटेल यांचा कानमंत्र
शिबिराचे आकर्षण ठरले ते गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे युवानेते हार्दिक पटेल. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करताना नवीन उर्जा दिली. महाराष्ट्रात काँग्रेसला सत्तेवर यायचे असेल तर सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर आपल्याला आवाज उठवावा लागेल, असा युवकार्यकर्त्यांना कानमंत्र दिला, त्याचे युवकांनी स्वागत केले. ही उर्जा आगामी विधानसभेच्या काळात युवकांना कामे येईल, यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com