रायगड जि .प. अध्यक्षपदी योगिता पारधी, तर सुधाकर घारे उपाध्यक्षपदी 

अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी अध्यक्ष पदासाठी योगिता पारधी, उपाध्यक्ष पदासाठी सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
Raigad-ZP president Yogita Pardhi
Raigad-ZP president Yogita Pardhi

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शुक्रवारी अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणूक झाली. या निवडणूकीत अध्यक्ष पदासाठी शेकापच्या योगिता पारधी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

पिठासन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी काम पाहिले. यावेळी उपविभागीय अधिकारी  शारदा पोवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांचे सहकार्य लाभले.


सकाळी अकरा ते एक यावेळेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. त्यामध्ये योगिता पारधी यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज भरले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी सुधाकर घारे यांनी अर्ज भरले. दुपारी दोन वाजता, जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेत अर्ज माघार घेण्याची प्रक्रीया राबविण्यात आली. दुपारी 2 ते 2.10 मिनिट या कालावधीत ही प्रक्रीया झाली. मात्र कोणीही अर्ज मागे घेतला नाही.

 
या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी अध्यक्ष पदासाठी योगिता पारधी, उपाध्यक्ष पदासाठी सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर योगिता पारधी, सुधाकर घारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 


अर्थ सभापती अँड. आस्वाद पाटील यांच्यासह आरोग्य व शिक्षण सभापती नरेश पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंडे, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, कृषी सभापती प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, अँड. निलीमा पाटील, चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, वैजयंती ठाकूर, दिलीप भोईर, आदी शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, व भाजपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद कार्यालयासह आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेला छावणीचे स्वरुप निर्माण झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com