महिला नर्सला त्रास देणारे `तबलिगी जमात`चे रुग्ण मानवतेेचे शत्रू : योगी आदित्यनाथ ही कारवाई करणार

लाॅक डाऊनसाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर हल्ले करण्यात सहभाग घेतलेल्यांनाही रासुका लावण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. या कायद्यानुसार आरोपीला बारा महिन्यांपर्यंत स्थानबद्ध ठेवता येते.
yogi adityanath
yogi adityanath

लखनौ : ``हे कायदा मान्य करणार नाहीत. व्यवस्थेचं यांना वावडं आहे. यांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे कृत्य केले आहे तो घुणास्पद अपराघ आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (NSA) कारवाई केली जाईल. त्यांना आम्ही सोडणार नाही, असे उद्गार दुसरे कोणाचे नसून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे. 

गाझियाबाद येथील एमएमजी हाॅस्पिटलमध्ये तबलिगी जमातचे सहा जण क्वारंटाईन केले आहेत. यातील काहीजण महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर नग्न फिरत असल्याचाी तक्रार करण्यात आली होती. तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली होती. या सर्व आरोपींची गणना आदित्यनाथ मानवतेचे शत्रू अशी केली असून त्यांना कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. या सहाजणांची आता दुसऱ्या रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्हि. के. सिंग यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.  

लाॅक डाऊनसाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर हल्ले करण्यात सहभाग घेतलेल्यांनाही रासुका लावण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. या कायद्यानुसार आरोपीला बारा महिन्यांपर्यंत स्थानबद्ध ठेवता येते. 

दुसरीकडे मुस्लीम धर्म किंवा नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग तसंच लॉकडाउन न पाळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांचा जमात-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी निषेध केला आहे. करोना व्हायरसचा फैलाव होऊ नयेयासाठी सर्व मुस्लीम कटिबद्ध आहेत. सोशल डिस्टन्सिंगची अमलबजावणी करणं अत्यंतगरजेचं आहे. नमाजच्या वेळी देखील याचं पालन झालं पाहिजे असं मौलाना महमूद मदनी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग न पाळणं हराम असल्याचं ते म्हणाले आहेत.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मौलाना महमूद मदनी बोलत होते. “भारतात १० लाख मशिदी आहेत. सर्वजण सरकारकच्या आदेशांचं पालन करत आहेत.करोनाविरोधातील लढाईत आम्ही सगळे एकत्र आहोत. भारतातील मुस्लीम १०० टक्के देशासोबत असून अशीच साथ देत राहू,” असं मौलाना महमूद मदनी यांनीम्हटलं आहे.

तबलिगी जमात मकरजचे प्रमुख मौलाना साद यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरही मौलाना महमूद मदनी यांनी मत माडंलं आहे.या ऑडिओ क्लिपमध्ये  मौलाना साद सांगत आहेतकी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची काही गरज नाही. मुस्लिमांना त्यांच्या धर्मापासून दूर ठेवण्यासाठी करोनाच्या नावाखाली हा कट आहे. मौलाना महमूद मदनी यांनीहे अत्यंत चुकीचं वक्तव्य असल्याचं म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com