परप्रांतियांच्या पाठीशी भाजपच उभा राहू शकतो : योगी आदित्यनाथ

परप्रांतियांच्या पाठीशी भाजपच उभा राहू शकतो : योगी आदित्यनाथ

मुंबई : परप्रातियांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे सरकारच खंबीरपणे उभे राहू शकते, असा ठाम विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

सांताक्रूज येथे झालेले उत्तर भारतीय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तर भारतीयांच्या वतीने आयोजित केलेल्या उत्तर प्रदेश दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की देशात ज्या राज्यात परप्रांतिय विसावले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे भाजप आणि भाजपचे सरकार उभे राहिले आहे. महाराष्ट्रात देखील आपणास हेच पहावयास मिळते. मुंबईच्या शहराच्या विकासात उत्तर भारतीयांचे योगदान मोठे आहे. मात्र काही जण परप्रांतियाविरोधात भूमिका घेऊन विनाकारण आवाज उठवत आहेत. त्यांना यात यश कदापि मिळणार नाही.

राम मंदिर उभारणी हे भाजपची पहिल्यापासून भूमिका आहे. त्यानुसार राम मंदिराची उभारणी होणार आहे. यात कसलीही शंका नसल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

 योगी यांनी प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्याची माहिती दिली. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे साडेतीन कोटी भाविक येणार आसून त्यांच्या आगमनाची चोख तयारी उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मजबूत देशाची उभारणी केली जात आहे. ते देशच्या विकासात महत्वाचे योगदान देत आहेत, असा गौरव त्यांनी केला.

या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com