इम्रान खानला वाटतेय नागपूरची भिती - योगी आदित्यनाथ

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले महत्वाचे शहर आहे. पवित्र दिक्षाभूमी आणि संत्र्यासाठी हे शहर देशभरात ओळखले जाते. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही नागपुरची भिती वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांतील त्यांच्या वक्तव्यांवरुन हे सिद्ध झाले आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे म्हणाले. गोरेवाडा रींग रोड परीसरात भाजपचे पश्‍चिम नागपुरचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.
इम्रान खानला वाटतेय नागपूरची भिती - योगी आदित्यनाथ

नागपूर : नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले महत्वाचे शहर आहे. पवित्र दिक्षाभूमी आणि संत्र्यासाठी हे शहर देशभरात ओळखले जाते. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही नागपुरची भिती वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांतील त्यांच्या वक्तव्यांवरुन हे सिद्ध झाले आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येथे म्हणाले. गोरेवाडा रींग रोड परीसरात भाजपचे पश्‍चिम नागपुरचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने जे काही केले, ते कॉंग्रेस सरकारसुद्धा करु शकत होते. पण त्यांना देशाच्या भल्यासाठी काम करण्याची फुरसत नव्हती. कारण त्यांनी देशाची सत्ता परीवारांमध्ये केंद्रीत केली. येवढे करुनही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले आजही सुधरले नाहीत. त्या सरकारने गरीबांच्या शौचालयांचे पैसेदेखील खालले. मुल्ला, मौलवींच्या दबावात त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. परिणामी महिला सशक्तिकरणाच्या प्रक्रियेत बाधा निर्माण झाली. येणाऱ्या कित्येक पिढ्या त्यांना माफ करणार नाही. आपल्या सत्ताकाळात कॉंग्रेसने देशाला लुटण्याचेच काम केल्याचा घणाघाती आरोप योगी आदित्यानाथ यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षांत देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत देश जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वसामान्यांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. मोदींच्या नेतृत्वात काश्‍मीरमधील 370 कलम एका झटक्‍यात रद्द झाले. तीन तलाखच्या बाबतीतही सरकारने योग्य निर्णय घेतला. त्यामुळे आता महीला सशक्तीकरण प्रक्रीयेला वेग मिळणार आहे. इन्फ्रास्ट्रक्‍चरची मोठी कामे देशात होत आहेत, असे सांगून त्यांनी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com