राहुल गांधींनी प्रचार केला की काँग्रेसचा पराभव निश्‍चित : योगी आदित्यनाथ

राहुल गांधींनी प्रचार केला की काँग्रेसचा पराभव निश्‍चित : योगी आदित्यनाथ

वलसाडमध्ये झालेल्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांनी 'जे तीन पिढ्यांमध्ये अमेठीचा विकास करू शकले नाहीत, ते गुजरातचा विकास काय करणार' असा प्रश्‍न उपस्थित करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

वलसाड (गुजरात) : गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापण्यास सुरवात झाली आहे. पक्षाच्या प्रचाराची बाजू भक्कम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज (शुक्रवार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरविले आहे. वलसाडमध्ये झालेल्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांनी 'जे तीन पिढ्यांमध्ये अमेठीचा विकास करू शकले नाहीत, ते गुजरातचा विकास काय करणार' असा प्रश्‍न उपस्थित करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

योगी आदित्यनाथ यांनी वलसाडमधील सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि 'स्टार कॅंपेनर' राहुल गांधी यांना लक्ष्य केले. 'राहुल गांधी जिथे जिथे प्रचार करतात, तिथे काँग्रेसचा पराभवच होतो' अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराची खिल्ली उडविली.

दरम्यान, वलसाडमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या वाहनांचा ताफा सभास्थानी जात असताना काही युवकांनी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न केला.

योगी आदित्यनाथ म्हणाले...

    ♦ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे.. कुठल्याही निर्णयासाठी ते नेहरू-गांधी परिवाराकडे धाव घेत आणि त्यांच्याकडून नकार आला, तर गप्प बसत.
    ♦ राहुल गांधी गेली 14 वर्षे अमेठीचे प्रतिनिधित्व करत आहेत; पण आजवर त्यांना इथे प्रशासकीय कार्यालय उभारता आलेले नाही. त्यांच्या तीन पिढ्या इथूनच निवडून आल्या, तरीही इथे विकास करता येत नसेल तर गुजरातचा विकास काय करणार?
   ♦ सरदार वल्लभभाई पटेल यांना 'भारतरत्न' देण्याबद्दल 41 वर्षं काँग्रेसने काहीही हालचाल केली नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी यावर पाऊल उचलले.
    ♦ गुजरातमध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, की राहुल गांधी इटलीमध्ये निघून जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com