yogeshwar datta | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

जवानांशी गैरवर्तन करणाऱ्यांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

सोनिपत : जो कोणी आपल्या देशाविरोधात कृती करेल आणि आपल्या सैनिकांशी गैरवर्तन करेल त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने व्यक्त केली आहे. 

CRPF या भारतीय निमलष्करी दलातील एका जवानाला श्रीनगरमध्ये काही युवकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय फलंदाज गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

योगेश्वर दत्त म्हणाला, "जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे. आमच्या CRPF जवानाचा अपमान करण्यात आला. त्यांच्या क्रूरपणे हल्ला करून त्यांचे हेल्मेटसुद्धा रस्त्यावर टाकून देण्यात आले. हे पाहणे अतिशय अपमानकारक व दुःखद आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख