पक्षातील स्पर्धकांना रोखण्याची क्षमता आमदार टिळेकर राखणार का ?

 पक्षातील स्पर्धकांना रोखण्याची क्षमता आमदार टिळेकर राखणार का ?

पुणे : भाजपकडून काल हडपसरचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्यासह नऊजणांनी मुलाखत दिली. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, नगरसेवक मारूती तुपे, उमेश गायकवाड या प्रमुख इच्छुकांशी उमेदवारीकरता टिळेकर यांना सामना करावा लागण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

आमदार टिळेकर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. या मतदारसंघात माळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्याचा फायदा गेल्यावेळी टिळेकर यांना मिळाला. मात्र, यावेळी विकास रासकर, मारूती तुपे व उमेश गायकवाड हे स्थानिक तगडे इच्छुक निर्माण झाले आहेत. ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष केल्याने रासकर यांना अधिक बळ मिळाले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी येवलेवाडी येथील जागेच्या संदर्भाने टिळेकर यांच्यावर आरोप झाले होते. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधक आणि पक्षातील स्पर्धकदेखील करतील त्यांच्यावर मात करण्याची क्षमता आमदार टिळेकर यांना राखावी लागणार आहे. 

मतदारसंघात टिळेकर यांच्याशिवाय इच्छुक असलेले उमेदवार 
विकास रासकर, जीवन जाधव, अनुपसिन्हा गौड, बाबासाहेब शिंगोटे, मारूती तुपे, ज्ञानेश्‍वर कुडले, मेघना पुराणिक, उमेश गायकवाड 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com