नगरसेवक ससाणेंच्या फ्लेक्सवर भाजपला टोमणा; पण राष्ट्रवादीची पंचाईत

महापौर निवडीच्या दिवशीच योगेश ससाणेंची फ्लेक्सबाजी
नगरसेवक ससाणेंच्या फ्लेक्सवर भाजपला  टोमणा; पण राष्ट्रवादीची पंचाईत

पुणे : पुण्याचा नवा महापौर कोण ? महापौरपदाचा मान कोणाच्या गटाकडे मिळेल ? त्यावरची भाजपमधील सुंदोपसुंदी ? उपमहापौरपद काढून घेतल्याने "आरपीआय'च्या आक्रमकतेने महापालिकेतील राजकीय वातावरण तापले असताना प्रवेशद्वारातील एका "फ्लेक्‍स'ने लोकांची करमणूक झाली.

"पुणेकरांनो हाय अलर्ट राहा,' अशी टोलेबाजी करीत, महापौरपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीने भाजपवर छुपा निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पदाधिकारी निवडीवरून भाजपमध्ये वाद होतात, महापालिकेचे नुकसान होते, असे सांगत राष्ट्रवादीने हा "फ्लेक्‍स' लावला. मात्र, भाजपवर टीका करणारा हा फ्लेक्‍सच बेकायदेशीररित्या उभारल्याने राष्ट्रवादीचीच पंचाईत झाली.

या खाटाटोप केला, तो "आंदोलन फेम' नगरसेवक योगेश ससाणेंनी. आपल्या लक्षवेधी "स्टाईल'ने ससाणेंनी हा "फ्लेक्‍स' लावला; खरा पण, त्यासाठी महापालिकेची साधी परवानगीही घेतली नसल्याने ससाणेही टीकेचे लक्ष ठरले. राजकीय विरोधकांचे लक्ष वेधण्याआधीच सासणे महापालिका प्रशासनाच्या रडावर आले असून, हा "फ्लेक्‍स' उतरण्याचे आदेश प्रशासनाने दिला.

महापालिकेत भाजपची सत्ता येताच 2017 मध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीदरम्यान, भाजपमध्ये वादाची घटना घडली. त्यात महापालिकेत तोफफोड झाल्याने ही निवड प्रक्रिया चांगलीच गाजली होती. या घटनेची आठवण करून देत ससाणेंनी महापौर निवडीच्या दिवशी (सोमवारी) सकाळीच महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात "पुणेकरांनो हाय ऍलर्ट राहा' अशा आशयाचा "फ्लेक्‍स' लावला. त्यावरून "कमांडो'च्या वेशातील आपली छबीही ससाणेंनी झळकवली. त्यामुळे हा फ्लेक्‍स आणि त्यावरील मजकूर चर्चेचा विषय झाला. सुदैवाने नव्या महापौरांच्या घोषणा शांततेत पार पडली मात्र राष्ट्रवादीचा "फ्लेक्‍स' पाहून गोंधळ उडाला.

दरम्यान, शहराच्या महत्त्वाच्या पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया असताना अशा प्रकारे फलक लावणे "स्टंटबाजी' असल्याचा टोमणा भाजपने हाणला आहे. तर, पुणेकरांच्या काळजीपोटी अशी सूचना केल्याचा दावा ससाणे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com