रोखठोक योगेश सागर यांनी केली स्वकीयांची गोची 

गोराईत खारफुटी उद्यान होत आहे पण खारफुटीवर होणाऱ्या अतिक्रमणाचे काय? हे अतिक्रमण आताच रोखले नाही तर भुमिपूजनच्या जागेवरीही अतिक्रमण होईल, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी राज्य सरकारला आज दिला. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
रोखठोक योगेश सागर यांनी केली स्वकीयांची गोची 

मुंबई : गोराईत खारफुटी उद्यान होत आहे पण खारफुटीवर होणाऱ्या अतिक्रमणाचे काय? हे अतिक्रमण आताच रोखले नाही तर भुमिपूजनच्या जागेवरीही अतिक्रमण होईल, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी राज्य सरकारला आज दिला. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. 

योगेश सागर हे त्यांच्या रोखठोक भुमिकांसाठी प्रसिध्द आहेत. त्याच बरोबर अनेक वेळा त्यांच्या साडेतोड स्वभामुळे पक्षाची गोचीही झाली आहे. नगरसेवक असताना महापालिकेच्या स्थायी समितीत टक्केवारी चालते असा आरोप त्यांनी बैठकीत केला होता. मात्र,आपण काही तरी जास्त बोललो असल्याचे लक्षात आल्यावर अधिकाऱ्यांची टक्केवारी चालते अशी सारवासारवही त्यांनी केली. त्यांना नगरविकास राज्यमंत्री पद मिळाले आहे. मात्र,त्यांचा साडेतोड स्वभाव आजही बदललेला नाही. गोराई येथील कांदळवन उद्यानाचे आज उदघाटन झाले. त्यासाठी नितीन गडकरी यांच्यासह उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे उपस्थीत होते. त्यांच्या समोरचा भाषणाच्या ओघात त्यांनी खारफुटीवरील अतिक्रमणावर बोट ठेवले. 

उद्यान होतयं, गोराई येथील सेक्‍टर आठ आणि दहा मधील खारफुटीवर होणारे अतिक्रमण ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येथील हजार चौरस मिटरच्या जागेवर अतिक्रमण करुन गोदामे उभारण्यात आली आहेत. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जागा म्हाडाची असल्याचे सांगितले जाते. खारफुटीची जागा कोणचाही असो पण ते संरक्षीत राहीले पाहिजे.ते सुरक्षीत केले नाही तर भुमिपूजनच्या जागेवरही अतिक्रमण होईल असे सांगत अतिक्रमण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरीत लवादाकडे जावे का असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थीतांना केला. 

सागर यांच्या या थेट भुमिकेमुळे व्यासपीठावरील गडकरी आणि तावडे यांची चांगलीच गोची झाली होती. 
पर्यावरणाच्या मुद्यावर वायू आणि जल प्रदुषणाची समस्या महत्वाची आहे. त्यावर उपाय करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भुमिका महत्वाची आहे, असे सांगत गडकरी यांनी खारफुटीची जबाबदारी अप्रत्यक्षपणे विनोद तावडे, योगेश सागर यांच्यासह स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्यावर सोपवली. त्याचबरोबर दिल्लीतील प्रदुषण,गंगा शुध्दीकरण,नागपुरात राबवलेले प्रकल्प याची माहिती त्यांनी सागर यांचे नाव घेत भाषणात दिली. तर,याबाबत वन आणि नगरविकास विभागा मार्फत योग्य कारवाई होईल असे आश्‍वासन तावडे यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com