आजचा वाढदिवस : योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे म.न.पा.  - yogesh mulik birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : योगेश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे म.न.पा. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जून 2018

योगेश मुळीक यांना अप्पा या टोपण नावाने वडगावशेरी परिसरात ओळखले जाते. मितभाषी, अभ्यासू, संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा म्हणून त्यांची ओळख आहे.  महानगरपालिकेच्या योजना ते नागरिकांपर्यंत पोचवून त्यांचा लाभ ते मिळवून देतात. 

योगेश मुळीक यांना अप्पा या टोपण नावाने वडगावशेरी परिसरात ओळखले जाते. मितभाषी, अभ्यासू, संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा म्हणून त्यांची ओळख आहे.  महानगरपालिकेच्या योजना ते नागरिकांपर्यंत पोचवून त्यांचा लाभ ते मिळवून देतात. 

2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत ते वडगावशेरीतील प्रभाग 5 मधून भाजपचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. त्यांचा प्रभागात इतर तीनही नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. यापूर्वी 2012 मध्येही ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मार्च 2018 मध्ये ते स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आमदार जगदीश मुळीक हे त्यांचे बंधू आहेत. वडगावशेरी परिसरात अनेक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मुळीक बंधूंचा मोठा वाटा आहे. यापूर्वी वडगावशेरी परिसरात पायाभूत सुविधांचा अभाव होता. मागील काही वर्षात अनेक विकासाची कामे राबवून पुणे शहराचे एक चांगले उपनगर म्हणून वडगाव शेरी विकसित झाले आहे. पाणी, वीज, रस्ते कचरा समस्या या प्राथमिक सुविधांवर त्यांनी या परिसरात भरीव काम केले आहे. 

योगेश मुळीक यांच्या कार्यकाळात ब्रह्मा सनसिटीसमोर सहा एकर जागेवर आधुनिक उद्यान त्यांनी उभारले आहे. हे उद्यान विकसित करण्यासाठी त्यांनी 12 कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे. या उद्यानात दोन 750 मीटरचे जॉगिंग ट्रॅक तयार केले आहेत. आधुनिक फुलराणी (बुलेटट्रेन), म्युझिकल कारंजे, लेसर शो, ओपन जीम, लहान मुलांसाठी विविध खेळण्याचे साहित्य, ऍक्‍युप्रेशर ट्रॅक इ. सुविधा निर्माण केल्या आहेत. ग्रंथालये सुरू केली आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख