YIN Summit 2017 | Sarkarnama

`यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'ची `समर युथ समिट' उद्यापासून 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मे 2017

करियरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी "यिन' करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या "यिन समर युथ समिट 2017' मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे. 

कोल्हापूर : करियरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी "यिन' करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या "यिन समर युथ समिट 2017' मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे. 

दरम्यान, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत आणि नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आणि विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही समिट होणार आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवनात होणाऱ्या समिटचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. 23) सकाळी 11 वाजता होणार आहे. कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये सुजय खांडगे (डिजिटल मार्केटिंग), निलया ग्रुपचे संस्थापक निलय मेहता (लाइफ स्किल व टीम बिल्डिंग), नागपूर येथील उद्योजक जयसिंग चौहान (उद्योजकता), डॉ. राम गुडगिला व सुनील पाटील आदी नामवंत सहभागी होणार आहेत. तसेच, देश-विदेशातील अन्य तज्ञही व्हिडिओ कॉन्फरर्न्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी येत्या मंगळवारपासून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, सातारा, अकोला, पुणे, जळगाव, मुंबई, औरंगाबाद आणि नांदेड येथे या समिट होणार आहेत. सलग तीन दिवसांचे चे आयोजन केले आहे. उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत तरुणांना आपल्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी "समर यूथ समिट' मोलाची भूमिका बजावणार आहेत. गेली दोन वर्षे "यिन' ही शिबिरे आयोजित करीत आहे. सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत ते होईल. 

विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था 
समीटमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल. 

`यिन समर युथ समिट 2017' 
केव्हा - मंगळवार (ता. 23) ते गुरुवार (ता. 25) सकाळी 9 ते सायंकाळी 6 
कोठे - वि. स. खांडेकर भाषा भवन सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
(अधिक माहितीसाठी संपर्क- सूरज- 9970876972, सुशांत- 8888166114.) 

मार्गदर्शक वक्ते असे : 
उद्योजक जयसिंह चौहान, शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, याहूज्‌ डिजिटल मार्केटिंगचे संस्थापक सूजय खांडगे, नीलय मेहता, विटो अल्बट्रो, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे सुनील पाटील, प्रसिद्ध जाहिरातकार अनंत खासबारदार, मानसोपचार तज्ज्ञ संतोष इंगळे, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्‍मा माने, प्रसिद्ध दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके. 

तरुणाईला दिशा देणारा उपक्रम 
राहुल चिकोडे, अध्यक्ष- विद्याप्रबोधिनी : ज्या तरुणाईच्या जोरावर आपण समर्थ भारताचे स्वप्न पाहत आहोत. तीच तरुणाई "यिन'च्या "समर यूथ समीट'च्या माध्यमातून एकवटणार आहे. नवप्रेरणांचा खळाळणारा झरा असणाऱ्या या तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. 

विधायक कामात तरुणाईचा पुढाकार 
राजू मेवेकरी, अध्यक्ष- महालक्ष्मी अन्नछत्र : हल्लीची तरुणाई बिघडली अशी वारेमाप चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात अनेक विधायक कामांत तरुणाईनेच पुढाकार घेतल्याचे दिसते. या तरुणाईला याच वयात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधता येणार असून त्यांच्यासाठी हा उपक्रम पर्वणी असेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख