yin kolhapur02 | Sarkarnama

प्रतिकूलता हीच तुमची प्रेरणा बनेल...! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मे 2017

महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी ठेवावी.

कोल्हापूर : महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी ठेवावी. युवकांनो, तुमची प्रतिकूलता हीच तुमची प्रेरणा बनेल आणि काळावर स्वार होणारी पिढी घडेल, अशा खणखणीत आत्मविश्‍वासाची पेरणी विविध वक्‍त्यांनी यिन सदस्यांमध्ये केली. इमेज बिल्डींगची उसनवारी होत नाही, हे लक्षात घेऊन डॉक्‍युमेंटेशनद्वारे स्वतः:ची इमेज बिल्डिंग निर्माण करा, असा सल्लाही वक्‍त्यांनी दिला. 

डिलिव्हरींग चेंज फाउंडेशनच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित "समर यूथ समीट'च्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांत सळसळती ऊर्जा वक्‍त्यांनी पेरली. दिवसभरातील वैविध्यपूर्ण विषयावरील मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडलीच, शिवाय कॉन्फिडन्स वाढल्याच्या प्रतिक्रियाही त्यांच्यातून व्यक्त झाल्या. स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी प्रस्तुत व नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व विद्याप्रबोधिनी यांचे सहप्रायोजकत्व आहे. वि. स. खांडेकर भाषाभवनात त्याचे आयोजन केले आहे. प्रेरणा शहा हिने सूत्रसंचालन केले. 

श्रीराम पवार (मुख्य संपादक, सकाळ माध्यम समूह) 
विषय : चेंजिंग मीडिया ट्रेंडस 
काळावर स्वार होणारी पिढी घडावी, यासाठी यिन चळवळ सुरू आहे. बदल न चुकणारे असतात. बदलाला जो सामोरा जात नाही, तो संपून जातो. प्रवाही असणे म्हणजे बदलाला सामोरे जाणे. बदल होत असताना एक अस्वस्थता असते. नव्या तंत्रज्ञानाचा आवाका लक्षात घेऊन मार्गक्रमण करावी लागते. अस्वस्थतेवर मात करण्याचे एकच तंत्र आहे, ते म्हणजे नव्या जगाची माहिती करून घेणे. शेती हाच रोजगाराचा मार्ग होता. ही स्थिती बदलून उद्योगधंद्यांत नोकऱ्या तयार झाल्या आणि नवी समाज रचना अस्तित्वात आली. 

सुनील पाटील (संचालक, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी) 
विषय : स्पर्धा परीक्षा 
स्पर्धा परीक्षा करिअरचा राजमार्ग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली आहे. या परिस्थितीत परवलीचे दोन शब्द सर्वांनाच माहीत होत आहेत. त्यातील एक एमपीएससी व दुसरा युपीएससी. स्पर्धा परीक्षांचे विश्‍व खूप मोठे आहे. ज्याला वशिल्याची गरज नाही व ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे. त्यांनी स्पर्धा परीक्षेत जरूर उतरावे. 

तेजस गुजराथी (मुख्य व्यवस्थापक, कम्युनिटी नेटवर्क, यिन) 
विषय : ओटीएक्‍स - थिंकिंग 
जीवनात कुणीच परिपूर्ण असू शकत नाही. व्हीजन ठरवून प्रवास केल्यास करियरची मार्ग सुकर होतो. फेसबूक प्रोफाइल कसे बनले पाहिजे, ई-मेल आयडी ओपन कसा केला पाहिजे, व्हॉट्‌स ऍप कम्युनिकेशन कसे करायला हवे, हे समजणे गरजेचे आहे. हे टूल्स कम्युनिकेशनचे चॅनेल्स आहेत. संगणकाचे स्किल घ्यायचे असेल, तर त्यात तडजोड करता कामा नये. युएसएच्या लोकांना इंग्रजी चांगले बोलता येत असेल, तर तसा बोलण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. 

अनंत खासबारदार (संस्थापक, निर्मिती ग्राफिक्‍स) 
विषय : इमेज बिल्डिंग 
स्वच्छ भारतसाठी 2014 ला बनविलेल्या लोगोचे कौतुक आजही सुरू आहे. अमुक करा-तमुक करा म्हणून सांगण्याइतका मी मोठा नाही. इमेज बिल्डिंग ही मोठी प्रक्रिया आहे. दिखाऊ व खरी इमेज बिल्डींग यात फरक आहे. इमेज बिल्डींग दिखाऊ वस्तूत नाही. इमेजची उसनवारी करता येत नाही. वाचन, निरीक्षणाचं स्थान, यातून ती घडत असते. देशाचा झेंडा गाडीवर लावून इमेज बिल्डिंग होत नाही. 

संतोष इंगोळे (मानसोपचार तज्ज्ञ) 
विषय : पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट 
कोणत्या प्रकारचे आव्हान घ्यावे लागेल. कोणत्या क्षेत्रात ती येत आहेत, हे समजून घ्या. त्यासाठी तुमचे माइंडसेट, स्किलसेट, टुलसेट बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला चॉईस असतो. पण, डिसिजन मेकिंग नसते. आतून बदलायला आपण तयार असत नाही. आपल्या स्वप्नांवर आपणच काम करायला हवे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख