"यंग इस्पिरेटर्स ऍवॉर्ड'ने सहा जणांचा सन्मान

"सकाळ- यिन'तर्फे आयोजित "समर यूथ समिट' शिबिरात आज सायंकाळी विविध क्षेत्रांतील सहा जणांचा "यंग इन्स्पिरेटर्स' पुरस्काराने गौरव करण्यात आला, त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
"यंग इस्पिरेटर्स ऍवॉर्ड'ने सहा जणांचा सन्मान

जळगाव : "तरुणाईत जग बदलण्याची क्षमता आहे. विविध क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना आज "यिन'च्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले असले, तरी आज या शिबिरात सहभागी तरुणांचा उद्या याच व्यासपीठावरून असाच गौरव होईल,' असा विश्‍वास महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी व्यक्त केला. 

"सकाळ- यिन'तर्फे आयोजित "समर यूथ समिट' शिबिरात आज सायंकाळी विविध क्षेत्रांतील सहा जणांचा "यंग इन्स्पिरेटर्स' पुरस्काराने गौरव करण्यात आला, त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, युनिट मॅनेजर संजय पागे, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक संदीप त्रिपाठी, "यिन'चे मुख्यमंत्री अनिकेत मोरे आदी उपस्थित होते. 

यावेळी आयुक्त सोनवणे म्हणाले, की तरुणाईने ठरविले तर ती काहीही करू शकते. मात्र, या प्रचंड ऊर्जा असलेल्या तरुणाईला योग्य दिशा, मार्गदर्शनाची गरज आहे. अविनाश धर्माधिकारी यांच्यासारख्या "आयएएस' अधिकाऱ्यांच्या हाताखाली मी काम केले आहे. प्रचंड क्षमता त्यांच्यात आहे. त्यांनी तरुणाईला दिशा देण्याचे ठरविले.

प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन स्वतंत्र संस्था सुरू केली आणि आजतागायत त्यांचे काम सुरू आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तींच्या मार्गदर्शनातून असे पुरस्कारार्थी घडत असतात. मीही खेड्यातून आलोय, कधी आयुक्त होईल असे वाटले नव्हते. मात्र, जिद्द व परिश्रम सुरूच ठेवले. 


काय म्हणाले पुरस्कारार्थी... 
या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी "आयएएस' प्रांजल पाटील, आशिष पाटील, अनुराग चांडक यांना प्रश्‍न विचारले. त्या प्रश्‍नांची या तिघांनी समर्पक उत्तरे दिली. प्रश्‍नोत्तराचा तासही या सत्रात चांगलाच रंगला.

आशिष पाटील यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणत्या वेबसाइट "रेफर' केल्या पाहिजेत, याबाबतही माहिती दिली. सहाही पुरस्कारार्थींनी या गौरवाबद्दल "सकाळ' समूहाचे आभार मानत हा पुरस्कार इतर कोणत्याही सन्मानापेक्षा खूप मोठा व महत्त्वाचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या. 

यांचा झाला सन्मान 
देशातील पहिल्या प्रज्ञाचक्षू आयएएस प्रांजल पाटील, राज्यस्तरावरील नाट्य स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांनंतर खानदेशला सुवर्णपदक मिळवून देणारी कलावंत अपूर्वा कुलकर्णी, तलवारबाजीत उल्लेखनीय कामगिरी करणारी मीनल चौधरी, प्रतिकूल स्थितीतून परिश्रम घेत आयएएस रॅंकिंग मिळवणारे आशिष पाटील, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी "गांधीछडी' हे अभिनव तंत्र विकसित करणारे अनुराग चांडक, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेष कामगिरी करणारे दिनेश देवरे यांचा "यंग इन्स्पिरेटर्स ऍवॉर्ड- 2017' देऊन गौरव करण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com