काल...आज अन्‌ उद्या....ओन्ली उदयनराजेच!

निवडणूक हरलेले नेते सध्या काय करतायत यावर `सरकारनामा`चा हा खास वृत्तांत!
udaynraje meets people regularly
udaynraje meets people regularly

सातारा : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर कधी घेणार याची उत्सुकता सातारकरांना आहे. मात्र, उदयनराजेंनी या सर्वाकडे दूर्लक्ष करून आपली संपर्क मोहिम कायम ठेवली आहे. अलिकडे जलमंदीर या निवासस्थानी जाऊन विविध कॉलेजचे युवक, युवती उदयनराजेंशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करत आहेत. खासदारकी असो अथवा नसो सध्यातरी साताऱ्यात उदयनराजे भोसले हे सर्वांसाठी `मोस्ट इंपॉर्टन्ट पर्सन` आहेत.

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढविली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना पुन्हा राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद देण्याबाबत चर्चा झाली. पण अद्याप या चर्चेला मुहूर्त स्वरूप आलेले नाही. एप्रिल महिन्यात याचा मुहूर्त असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. त्यामुळे तोपर्यंत उदयनराजे भोसले कुठे आहेत, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.

उदयनराजेंनी पराभवानंतर खचून न जाता आपला जनसंपर्क आजही कायम ठेवला आहे. जलमंदीर पॅलेस या त्यांच्यानिवासस्थानी ते जनता दरबार घेऊन जनतेचे विविध प्रश्‍न सोडवितात. तसेच मतदारसंघात ही त्यांनी आपली संपर्क मोहिम कायम ठेवली आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जिल्ह्यात फिरत असतात. अलिकडे त्यांच्याशी विविध कॉलेजचे युवक, युवती संपर्क ठेऊन आहेत. जलमंदीर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी जाऊन कॉलेजचे युवक, युवती त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करत आहेत. त्यामुळे खासदार असोत अथवा नसोत साताऱ्यात उदयनराजे भोसलेच सर्वांसाठी महत्वाचे ठरेल आहेत.

आज त्यांनी आपल्या व्टिटर अकौंटवरून पद असेल किंवा नसेल. परंतु जनतेबद्दल असलेले प्रेम आणि आदर शेवटच्या श्‍वासापर्यंत कायम तसाच राहणार आहे. सावली साथ सोडेल पण आम्ही नाही...असे ट्विट करून त्यासोबत एक व्हिडीओही व्हायरल केला आहे. त्यामध्ये ते एका वृद्ध आजीला धीर देत असल्याचे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com