राजकीय गुंता वाढल्याने येवल्यात यंदा भुजबळांपेक्षा शिवसेनेचीच सत्वपरिक्षा 

येवल्याचे राजकारण २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक 'यू टर्न' घेऊन बदलले होते तशीच वेळ २०१९ च्या निवडणुकीतही येऊ शकते. ज्या पद्धतीने २००९ व २०१४ चे राजकारण एकतर्फी हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या भोवती घिरट्या घालणारे राहिले तसे मात्र यावेळी नाही.विकासाला लागलेला ब्रेक,स्थानिक नेत्यांची खदखद, सामान्यात असलेली नाराजी यामुळे भुजबळांना ही निवडणूक गेल्या तिन्ही निवडणुकांपेक्षा संघर्षाची आहे.
राजकीय गुंता वाढल्याने येवल्यात यंदा भुजबळांपेक्षा शिवसेनेचीच सत्वपरिक्षा 

येवला : येवल्याचे राजकारण २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अचानक 'यू टर्न' घेऊन बदलले होते तशीच वेळ २०१९ च्या निवडणुकीतही येऊ शकते. ज्या पद्धतीने २००९ व २०१४ चे राजकारण एकतर्फी हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या भोवती घिरट्या घालणारे राहिले तसे मात्र यावेळी नाही.विकासाला लागलेला ब्रेक,स्थानिक नेत्यांची खदखद, सामान्यात असलेली नाराजी यामुळे भुजबळांना ही निवडणूक गेल्या तिन्ही निवडणुकांपेक्षा संघर्षाची आहे.

शिवसेनेतही संघटन पातळीवर फिलगुड असले तरी अंतर्गत गटबाजी आणि उमेदवारीसाठीची स्पर्धा जोरात आहे. सध्याचे राजकीय समीकरणे पाहता राष्ट्रवादीसह शिवसेनेचीही या निवडणुकीत सत्वपरीक्षाच पाहिली जाईल असे दिसतेय. गोंधळात भाजपा,कॉंग्रेस व वंचित आघाडीची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. 

गत निवडणुकीत भुजबळांच्या नेतृत्वाखाली सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या हाती होत्या. यंदा चित्र वेगळे आहे. त्यामुळे भुजबळ अडचणीत आहेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विश्वासू सहकारी, भुजबळांचे निमंत्रक असलेले माणिकराव शिंदे नाराज आहेत. ते स्वतःसाठी भुजबळांकडे उमेदवारी मागत आहेत. यामध्ये भुजबळ येवल्यातून उमेदवारी करणार हे नक्की. मात्र यामध्ये शिंदे यांची भूमिका काय राहणार याला महत्व आले आहे. त्यावर काही राजकीय गणिते ठरतील. दुसरे सहकारी अंबादास बनकर प्रकृतीच्या कारणाने दुर आहेत. अशा स्थितीत मोजके कार्यकर्ते, समता परिषद वगळता अन्य गट सक्रिय झाल्याचे दिसत नाही. यामद्ये झालेल्या चुकांची सुधारणा करून बेरजेचे राजकारण करण्याचे आव्हान भुजबळांपुढे आहे. 

नरेंद्र दराडे व किशोर दराडे हे शिवसेनेचे आमदारद्वय युवा नेते संभाजी पवारांच्या पुढाकाराने येथील अनेक संस्थांतही शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे. लोकसभेलाही शिवसेनेनेच पुढाकार घेऊन भाजपाच्या भारती पवारांना २८ हजारांचे मताधिक्‍यच मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेची बाजू वरचढ व मोदी लाटेत भक्कम वाटत आहे. मात्र अंतर्गत गटबाजीची साडेसाती छगन भुजबळ आणि शिवसेना दोघांनीही सतावते आहे. सध्या संभाजी पवार हे उमेदवारीचे दावेदार मानले जातात. माजी आमदार मारोतराव पवारांसह स्वतः संभाजीराजेंनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढत भेटीगाठी घेतल्या आहेत. नातंगोतं आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांना ही निवडणूक सोपी वाटत आहे. 

तर गेल्या दोन वर्षापासून मतदारसंघात सामाजिक कार्य हाती घेऊन गरजूंना पंचवीस ते तीस लाखाची मदत देत नावारूपाला आलेले पंचायत समितीचे उपसभापती रूपचंद भागवत यांनीही मातोश्रीपर्यंत फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता उमेदवार पवार की भागवत याभोवतीच शिवसेनेतला कलह सुरू आहे.

४४ गावांमधूनही शिवा तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेशी जवळीक असलेले राज्याचे विस्तारक कुणाल दराडे यांचेही नाव चर्चेत आहे,दराडे परिवार मात्र अद्याप नकाराच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मातोश्रीची भूमिकाच आता येवल्यातील शिवसेनेचे भविष्य ठरविणारा हे नक्की. एखादा बडा मासा गळाला लावण्याचे प्रयत्न वंचित बहुजन आघाडीकडून सुरु आहे. युती किंवा आघाडीचे बिनसले तर मोठा नेता उमेदवार होऊ शकेल. यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा व शिवसेनेचे सत्व दोघांची परिक्षा विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. 

येवला मतदारसंघ (२०१४) 
छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - १,१२,७८७
संभाजी पवार (शिवसेना) - ६६३४५
शिवाजी मानकर (भाजपा) - ९३३९

लोकसभा निवडणूक - २०१९
भारती पवार (भाजपा) - ९५७०९
धनराज महाले (राष्ट्रवादी) - ६७५८९ 
भाजपाचे मताधिक्‍य - २८१३०

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com