मांजरपाड्याचे पाणी येवल्याला पोहोचल्यावर समीर भुजबळांसह येवलेकर बॅड वाजवून नाचले

येवला हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, येवल्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी पाहिलेले मांजरपाड्याचे स्वप्न आज पूर्ण झाले असून मांजरपाड्याच्या पाण्यामुळे येवला तालुक्याच्या नावापुढे कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Yeola Residents Dance When Manjarpada Water Arrived
Yeola Residents Dance When Manjarpada Water Arrived

येवला  : येवला हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, येवल्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी पाहिलेले  मांजरपाड्याचे स्वप्न आज पूर्ण झाले असून मांजरपाड्याच्या पाण्यामुळे येवला तालुक्याच्या नावापुढे कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

पुणेगाव दरसवाडी कालव्याच्या संदर्भात ४४ वर्षांपूर्वी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले मी त्यांचा मनापासून आभारी आहे.असे सांगून छगन भुजबळ म्हणाले की, माजी आमदार कै.जनार्दन पाटील यांनी रोजगार हमी कालव्याची निर्मिती केली. मात्र पुढे या कालव्याचे काम पुढे झाले नाही. त्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर याबाबत माहिती घेतली. यासाठी अनेक नागरिकांनी आंदोलने केले आणि घाम गाळला  होता. कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्याच्या नावापुढील दुष्काळी शब्द पुसला गेला पाहिजे.

ते म्हणाले की, दरसवाडी डोंगरगाव कालव्यावरील अनकाई येथील रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच किमी ४२ ते ६० बाळापूर ते हडपसावरगाव मधील अपूर्ण स्ट्रॅक्चर,भराव आणि खोदाई इत्यादी कामे पावसाळ्यानंतर लवकरच पूर्ण होतील.पुणेगाव कालव्याचा सुरवातीचा किमी ० ते२५ या अरुंद भागाचे विस्तारीकरण आणि इतर काही कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या असल्याने कालव्याची राहिलेली कामे यापुढील काळात मार्गी लावली जातील आणि या कालव्यातील त्रुटी दूर केल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.यासाठी निधीची तरतूद देखील केलेली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कालव्यातील अडथळे दूर करण्यासाठी मोहन शेलार,दिलीप खैरे यांची सर्व टीम,शेतकरी बांधव यांच्यासह ज्यांनी ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्या सर्वांचे छगन भुजबळ यांनी आभार मानले.

यावेळी कातरणी येथील गावकऱ्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे गावात पारंपरिक वाद्य वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी नागरिकांनी कातरणी गावातून कालव्यापर्यंत फुलांनी सजविलेल्या वाहनातून भुजबळ यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांनी वाद्याच्या तालावर ठेकाही धरला. समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ हेही त्यांच्या मध्ये सामील झाले.या दरम्यान तालुक्यातील विविध गावागावातील शेतकऱ्यांनी भुजबळांचा सत्कार केला. ४४ वर्षानंतर गावात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com