yelgaokar demans mocca action against gore | Sarkarnama

आमदार जयकुमार गोरेंना मोक्का लावा : येळगावकर

उमेश भांबरे
रविवार, 2 डिसेंबर 2018

सातारा : पनवेल पोलिस ठाण्यात माणचे आमदार जयकुमार गोरे व त्यांचा स्वीय सहायक यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून गोरेंवर मोकातंर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती खटावचे भाजपचे नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनी आज येथे केली. 

पत्रकार परिषदेत डॉ.येळगावकर म्हणाले, की कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित जमिनीचा हा विषय असून तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकालातील हे प्रकरण आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकालातीलच असल्याचे सांगितले आहे. 

एका व्यक्तीने जमीन विकण्यासाठी दोघांना साठेखत करून दिले आहे. आजपर्यंत केवळ केवळ राजकिय दबावामुळे हे प्रकरण उघड झाले नव्हते. पनवेल पोलिस ठाण्यातील अधिकारी दबावाखाली असून त्यांनी एफआयआर दाखल केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी. तसेच माणचे आमदार गोरेंवर तातडीने गुन्हे दाखल करावेत व त्यांच्यावर मोकातंर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. 

या प्रकरणातील गोसावी नावाच्या व्यक्तीला संपविण्याची गोष्ट चालली आहे. यामध्ये आमदार जयकुमार गोरेंसह त्यांचा स्वीय सहाय्यकाने यामध्ये खंडणी मागीतल्याचा ऑडीओ ही आमच्याकडे आहे. केवळ लोकप्रतिनिधी असल्याने गुन्हा दाखल करण्यात विलंब केला आहे. त्यामुळे पनवेल पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारीही या प्रकरणात निलंबित झाले पाहिजेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख