आयुष्यभरच माझी अग्निपरिक्षा - बी. एस. येडियुरप्पा; विश्वासदर्शक ठराव न मांडताच केली राजिनाम्याची घोषणा

आयुष्यभरच माझी अग्निपरिक्षा - बी. एस. येडियुरप्पा; विश्वासदर्शक ठराव न मांडताच केली राजिनाम्याची घोषणा

बंगळुर - आज विधानसभेच माझी अग्निपरिक्षा होती असे सांगितले गेले. पण ही अग्निपरिक्षा मला नवी नाही, माझी आयुष्यभरच अग्निपरिक्षा होत राहिली आहे, असे भावूकतेचे उद्गार कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज विधानसभेत काढले.

कर्नाटक विधानसभेत विश्वादर्शक ठराव न मांडता येडियुरप्पांनी राज्यातल्या जनतेला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, " कर्नाटकात काँग्रेस- जेडीएसला जनतेने नाकारले. जनतेचा 104 जागांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. काँग्रेस किंवा जेडीएसकडे बहुमत नव्हते. काँग्रेस- जेडीेएस एकमेकांच्या विरोधात लढले आणि नंतर सोयीसाठी एकत्र आले. कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले" 

ते पुढे म्हणाले, "कर्नाटकच्या जनतेने मला दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी जीवन समर्पित करण्यासाठी मी तयार आहे. साडेसहा कोटी जनतेच्या हितासाठी काम करण्याची माझी जबाबदारी आहे. राज्यात शेतीसाठी पाणी, दीड लाख शेतकऱ्यांना पाणी देण्याचा मी विचार केला होता. कर्जमाफीचा विचार केला होता दोन वर्षे मी राज्याचा दौरा करत होतो. इथल्या नागरिकांच्या चेहेऱ्यावरच्या वेदना मी पहात होतो. काही घरांत मी मुक्कामही केला होता. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा माझा प्रयत्न होता. पण त्यासाठी परवानगी मिळाली नाही. इथे काँग्रेसचे सरकार असूनही पंतप्रधान मोदींनी कधी मदतीसाठी नाही म्हटले नाही." कर्नाटकला इमानदार नेत्यांची गरज आहे, असेही येडियुरप्पा यांनी सांगितले.  

"मी राज्यातल्या जनतेला आश्वासन देतो की जोपर्यंत माझा श्वास सुरु आहे तो पर्यंत मी राज्यात सर्वत्र जाईन आणि पुढे निवडूनही येईन. आम्ही दीडशेपेक्षा जास्त जागांवर विजयी होऊ याबाबत आम्हाला शंका नाही. कर्नाटकात लोकसभेच्या 28 च्या 28 जागा भाजप जिंकेल. आम्हाला या निवडणुकीत १०४ ऐवजी ११३ जागा मिळाल्या असत्या, तर आम्ही हे राज्य सुजलाम सुफलाम केले असते," असे सांगत येडियुरप्पा यांनी आपण विश्वासदर्शक ठराव न मांडता राज्यपालांकडे जाऊन राजिनामा देत असल्याचे विधानसभेत सांगितले. 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com