कर्नाटक पोटनिवडणुकीतील सर्व विजयी आमदारांना मंत्रिपदे

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी पुढील दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सांगितले.
yediyurappa cabinet expansion
yediyurappa cabinet expansion

बंगळूर : पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या आमदारांना मंत्रीपद देण्याचे निश्‍चित करीत पुढील दोन दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी मंगळवारी (ता. 10) केली.  

विधानसभेच्या आवारात आज (ता. 10) दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. निगलिंगप्पा यांची 117 वी जयंती साजरी झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी पुढील दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सांगितले. 

आमदार रमेश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्रीपदासह पाटबंधारे खात्याची मागणी केली आहे. चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे वैद्यकीय शिक्षण खात्याची मागणी केली आहे. भैरती बसवराज यांनी बंगळूर नगरविकास खात्यावर लक्ष ठेवले. बी. सी. पाटील यांनी थेट गृहमंत्रीपदाची मागणी केली आहे. मात्र हे खाते त्यांना मिळण्याची शक्‍यता धुसर आहे.
 
भाजप सरकारने राज्याला तीन उपमुख्यमंत्री दिले आहेत. त्यात आणखी एका उपमुख्यमंत्रीपदाची भर पडणार असल्याने उपमुख्यमंत्र्यांची संख्या चारवर पोचणार आहे. मात्र चौथे पद मिळविण्यासाठी बी. श्रीरामलु आणि रमेश जारकीहोळी यांच्यामध्ये चुरस निर्माण आहे. जारकीहोळी यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले आहे. पोटनिवडणुकीपूर्वी श्रीरामलुंचे नाव चर्चेत होते. मात्र जारकीहोळींना हे पद मिळणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. पोटनिवडणुकीत श्रीरामलुंकडे हुनसूरची जबाबदारी सोपविली होती. मात्र तेथील भाजप उमेदवाराचा पराभव झाला असल्याने उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते बॅकफूटवर गेले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com