येडियुरप्पांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ ; सोमवारी बहुमत परीक्षा

कर्नाटकचे प्रभावी राजकारणी म्हणून त्यांना ओळखले जाते, ते तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. दक्षिणेत पहिल्यांदा भाजपला सत्तेवर आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
Yeddyurappa
Yeddyurappa

बंगळूर  : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कर्नाटकातील सत्तानाट्यावर पडदा पडला.

 येडियुराप्पांसोबत अन्य कोणत्याच मंत्र्यांना शपथ देण्यात आली नाही. बहुमत सिध्द केल्यानंतर ते आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.  कॉंग्रेस व धजदने कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. 

सोमवारी  विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याची माहिती नूतन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली. राजभवानात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना अधिकार व गोपनियतेची शपथ दिली.  बहुमत सिध्द करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. एका अपक्षासह भाजपकडे 106 सदस्य असून सध्या असलेल्या 221 सदस्यांच्या सभागृहात (तिघे अपात्र वगळून) बहुमतासाठी 111 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.

विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी गुरुवारी कॉंग्रेसच्या तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले आहे. त्यात अजूनही 13 बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारणे शिल्लक आहे. सध्या सभागृहात आमदारांची संख्या 221 इतकी आहे. बहुमतासाठी भाजपला 111 आमदारांची आवश्‍यकता आहे. सद्यस्थितीत भाजपकडे एका अपक्ष आमदारासह 106 आमदारांचे समर्थन आहे. यामुळे आवश्‍यक असेलल्या 6 आमदारांचे पाठबळ भाजप कुठून मिळवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस- धजदचे युती सरकारचे पतन झाल्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने राष्ट्रपती राजवटीची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. त्यातच भाजप हायकमांडने त्यांना सरकार स्थापण्यास ग्रीन सिग्नल दिल्यानंतर येडियुराप्पा यांनी शुक्रवारी सकाळीच राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा आजच घेण्यात यावा, अशी विनंती येडियुराप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना केली. राज्यपाल वाला यांनी येडियुरप्पांचा प्रस्ताव मंजूर केला व आजच शपथग्रहण सोहळा करण्यास अनुमती दिली.  

1983 मध्ये प्रथम शिकारीपूर विधानसभा मतदार संघातून येडियुराप्पा विधानसभेवर निवडून आले. आतापर्यंत त्यांनी सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कर्नाटकचे प्रभावी राजकारणी म्हणून त्यांना ओळखले जाते, ते तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. दक्षिणेत पहिल्यांदा भाजपला सत्तेवर आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.   
 

येडियुरप्पा म्हणाले, " सोमवारी विधिमंडळ अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजता अधिवेशनाला सुरवात होईल. त्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव सादर करून बहुमत सिध्द करण्यात येईल. विश्वासदर्शक ठराव व वित्त विधेयक मंजूर करावयाचे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com