यवतमाळ-वाशीम : कॉंग्रेसमध्ये स्पर्धा; सेनेकडून गवळींच्या नावाची चर्चा, वंचित आघाडीचे आव्हान

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट लढतीचे चित्र आहे. असे असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काहींचे समीकरण बदलणार, यात शंका नाही.
यवतमाळ-वाशीम : कॉंग्रेसमध्ये स्पर्धा; सेनेकडून गवळींच्या नावाची चर्चा, वंचित आघाडीचे आव्हान

यवतमाळ  : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ आज शिवसेनेचा गड झाला आहे. मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात यावा, यासाठी आघाडीचे प्रयत्न सुरू असले तरी पुन्हा भगवा फडकविण्यासाठी युती सज्ज आहे. आघाडी व युतीला यंदा वंचित बहुजन आघाडीचे आव्हान राहणार आहे. शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट लढतीचे चित्र आहे. असे असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काहींचे समीकरण बदलणार, यात शंका नाही. अनेक वर्षे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेने कॉंग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत शिवसेनेचा गड केला आहे. आगामी निवडणुकीतही कॉंग्रेस-शिवसेना असाच सामना रंगणार आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्‍चित मानला जात आहे.

मतदारसंघांत भेटीगाठी, भूमिपूजनाच्या निमित्ताने त्यांनी तयारी सुरू केली आहे. भावना गवळी विरोधात कॉंग्रेसकडून कोण, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा असली तरी शिवाजीराव मोघे, जीवन पाटील, डॉ. टी. सी. राठोड, डॉ. मोहम्मद नदीम यांनी त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत आव्हान दिले आहे.

त्यामुळे उमेदवारीवर दिल्लीत खलबते सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाचे प्रा. प्रवीण पवार यांना उमेदवारी जाहीर करून तगडे आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले होते. स्थानिक विकासनिधी व इतर निधीतून मंजूर केलेल्या विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सत्ताधाऱ्यांकडून सुरू होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला "ब्रेक' लागला आहे.

26 लाखांवर मतदार
यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीत यंदा जवळपास 26 लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 21 लाख मतदार असून, वाशीम जिल्ह्यातील कारंजा व वाशीम विधानसभा मतदारसंघातील सहा लाख मतदारांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com