Yavatmal politics | Sarkarnama

यवतमाळ भाजप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायम 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीतही भाजप-कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी कायम राहिली. भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एक सभापतींचे पद मिळाले. त्याचप्रमाणे अपक्ष सदस्यांनाही सभापती म्हणून सामावून घेण्यात आले. या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मनोहर नाईक यांच्या गटाला काहीही मिळाले नाही. 

नागपूर : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीतही भाजप-कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी कायम राहिली. भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एक सभापतींचे पद मिळाले. त्याचप्रमाणे अपक्ष सदस्यांनाही सभापती म्हणून सामावून घेण्यात आले. या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मनोहर नाईक यांच्या गटाला काहीही मिळाले नाही. 

शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस-भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी आघाडी झाली होती. यात कॉंग्रेसला अध्यक्षपद मिळाले तर उपाध्यक्षपद भाजपला गेले. सभापतींच्या निवडणुकीत या पक्षांनी समान वाटपाचे सूत्र कायम राखले. यात अर्थ व बांधकाम सभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निमिष मानकर यांना मिळाले. मानकर हे माजी आमदार संदीप बाजोरीया गटाचे मानले जातात. 

महिला व बाल कल्याण सभापतिपद कॉंग्रेसच्या अरुणा खंडाळकर यांना तर समाज कल्याण सभापतिपदी भाजपच्या प्रज्ञा भूमकाळे यांची निवड झाली. अपक्ष नंदिनी दरणे यांना शिक्षण व आरोग्य सभापती देण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख