yavatmal politics | Sarkarnama

यवतमाळमध्ये सेना-राष्ट्रवादी एकत्र 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 14 मार्च 2017

यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येऊन सत्ता संपादन केली आहे.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येऊन सत्ता संपादन केली आहे. सेनेने भाजपला व राष्ट्रवादीने कॉंग्रेसला या निवडणुकांत दोन हात दूर ठेवल्याचे चित्र दिसून आले आहे. 

जिल्ह्यात एकूण 16 पंचायत समित्यांमधील सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक पार पडली. यात सर्वाधिक पंचायत समित्या शिवसेनेने पटकावल्या. जिल्ह्यातील
6 पंचायत समित्यांवर सेनेने भगवा फडकावला. जिल्हा परिषद निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या कॉंग्रेसनेही या निवडणुकीत 5 पंचायत समित्यांवर
कब्जा केला. भाजपला 4 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकाच पंचायत समितीमध्ये सत्ता संपादन करता आली. राळेगाव पंचायत समितीचा निकाल ईश्‍वरचिठ्ठीवर लागला.
यात कॉंग्रेसचा उमेदवार नशीबवान ठरला. आर्णी पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस व भाजपची आघाडी झाली. सेनेला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस भाजपने आघाडी केली. 

पक्षनिहाय पंचायत समित्यांचे सभापती : 
शिवसेना- यवतमाळ, नेर, दारव्हा, उमरखेड, पांढरकवडा, दिग्रस 
कॉंग्रेस- राळेगाव, महागाव, मारेगाव, आर्णी, कळंब, 
भाजप- वणी, घाटंजी, बाभूळगाव, झरीजामणी, 
राष्ट्रवादी- पुसद 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख