यवतमाळमध्ये ठाकरे पिता-पुत्रांविरोधात अभियान 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी माणिकराव ठाकरे यांना मिळू नये, यासाठी याजिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्व गट एकत्र आले आहेत. हे सर्व नेते मिळून लोकांपर्यंत जाऊन "ठाकरे नको' हा एकच मुद्या कार्यकर्त्यांमध्ये रेटत आहे.
यवतमाळमध्ये ठाकरे पिता-पुत्रांविरोधात अभियान 

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी माणिकराव ठाकरे यांना मिळू नये, यासाठी याजिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्व गट एकत्र आले आहेत. हे सर्व नेते मिळून लोकांपर्यंत जाऊन "ठाकरे नको' हा एकच मुद्या कार्यकर्त्यांमध्ये रेटत आहे. 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून यावेळी कॉंग्रेसच्या विजयाची चांगली संधी आहे. हे हेरून कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच चढाओढ सुरू आहे. विधान परिषदेचे माजी सभापती माणिकराव ठाकरे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. माणिकराव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र राहुल ठाकरेही बाशिंग बांधून आहेत. ठाकरे यांचे वरिष्ठ पातळीवर चांगले संबंध असल्याने ते दिल्लीहून कॉंग्रेसची उमेदवारी आणू शकतात. 

माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात आता कॉंग्रेसचे जिल्ह्यातील सर्व गट एकत्र आले आहेत. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे सुपुत्र जीवन पाटील, सेवानिवृत्त अधिकारी टी. सी. राठोड व डॉ. नदीम खान हे कॉंग्रेसकडून इच्छुक आहेत. 

सर्वांनी आता ठाकरे पिता-पुत्रांचा विरोध अभियान राबविणे सुरू केले आहे. हे चौघेही नेते मिळून सर्व गावांमध्ये जाऊन ठाकरे पिता-पुत्रांच्या उमेदवारीला विरोध कसा कॉंग्रेसच्या फायद्याचा आहे, हे आपआपल्या परीने सांगत आहे. 

माणिकराव ठाकरे दोनवेळा विधानसभेत निवडून आले आहेत. 1995 पासून ते सातत्याने पराभूत होत आहेत. त्यांचे सुपुत्र राहुल ठाकरेही दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराजीत झालेले आहेत. या पराभूत पिता-पुत्रांना पुन्हा उमेदवारी नको, या एकाच मुद्यावर सर्व विरोधक एकत्र आले आहेत. या चौघांनाही मानोरा, आर्णी व कारंजा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये भेटी देऊन ठाकरे पिता-पुत्रांच्या विरोधात सर्वजण एकत्र असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com