यवतमाळमध्ये सहकारातही निवडणुकीची धामधूम

मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुधवारी (ता.29) नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून, नामांकन दाखल करण्यासाठी मुंबईकडे कूच केली आहे
Yavatmal Co operative Sector Active for Various Elections
Yavatmal Co operative Sector Active for Various Elections

यवतमाळ  : लोकसभा, विधानसभा व विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीनंतर आता सहकार क्षेत्रातही निवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. बहुप्रतीक्षेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी बॅंक प्रतिनिधी पाठविण्याची लगबग सोसायटीस्तरावर सुरू आहे. यासोबतच मुंबई बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सहकारातील नेते पुन्हा सक्रिय झाले आहेत.

सहकार क्षेत्रावर सुरुवातीपासूनच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रस्थ राहिले आहे. या दोन पक्षातील नेत्यांनी वर्षांनुवर्ष सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याचे राजकारण केले आहे. वेळप्रसंगी अनेक उलटफेर केल्याचीही उदाहरणे आहेत. एकेकाळी सहकार क्षेत्राचा असलेला दबदबा आता कमी झाला आहे. अनेक संस्था अवसायनात निघाल्या आहेत. काही अखेरच्या घटका मोजत आहेत, तर फार कमी संस्था नियमित सुरू आहेत. यासोबतच कायद्यातही अनेक बदल करण्यात आले. 

त्यामुळे सहकार क्षेत्र दोन्ही कॉंग्रेसच्या ताब्यातून काढण्याचे मनसुबे भाजपचे होते. तसे प्रयत्नही झाले. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहकार क्षेत्रात पुन्हा बदल सुरू झाले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपले शक्तीस्थळ बळकट करण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी मार्चमध्ये मतदान होणार आहे. यासाठी सोसायटीस्तरावर बॅंक प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गावपातळीवरील वातावरण ढवळून निघाले आहे. सोबतच मुंबई बाजार समितीची निवडणूक लागली आहे. त्यामुळे आणखी भर पडली आहे. एकंदरीतच 2020 हे वर्ष सहकार क्षेत्रासाठी महत्वाचे ठरणार असल्याचे दिसून येत असून, निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

मुंबई बाजार समितीवर नेत्यांचा फोकस

मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बुधवारी (ता.29) नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून, नामांकन दाखल करण्यासाठी मुंबईकडे कूच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले सहकार क्षेत्र निवडणुकांमुळे पुन्हा अॅक्‍टिव्ह झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com