यशवंतराव गडाख रमले वाचन अन नातवांच्या गोष्टीत

माजी खासदार यशवंतराव गडाख यांनीलाॅक डाऊनच्या काळातएस. एल. भैरप्पा यांच्या `वंशवृक्ष`, `पर्व`, `धर्मश्री` व `काठ`या कादंबऱ्या वाचल्या.रंगनाथ पठारे यांचे `सातपाटील कुलवृंतात` व `ताम्रपट`हे पुस्तक वाचले.
Yeshvantrao Gadakh
Yeshvantrao Gadakh

सोनई : लाॅक डाऊनच्या काळात सर्वच मंडळी घरात असल्याने ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी खासदार यशवंतराव गडाख वाचनात दंग झाले आहेत. नातवांना गोष्टी सांगून त्यांची करमणूक करीत आहेत. तसेच घरकामातील उन्हाळी पदार्थ (वाळवण) तयार करण्याच्या प्रक्रियेत हातभार लावत ते लाॅकडाऊन सुट्टीचा आनंद घेत आहेत. 

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून यशवंतराव गडाख हे राजकीय, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मंडळींचे मार्गदर्शक आहेत. जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे काैटुंबिक संबंध आहेत. राजकारणापलिकडे त्यांनी साहित्य क्षेत्रात वेगळे काम केले आहे. नेवासे तालुक्याच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोठा हातभार आहे. अनेक पुस्तकांचे लिखान करून साहित्य चळवळीला त्यांनी चालना दिली. जिल्ह्यात साहित्य क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी गडाखांचा हातभार मोलाचा आहे. त्यामुळेच राज्यातील साहित्यिकांना गडाख अत्यंत जवळचे वाटतात.

लाॅक डाऊनच्या काळातील वेळेबाबत ते सांगतात, ``सध्या लाॅक डाऊनमुळे वेळच वेळ असल्याने एस. एल. भैरप्पा यांच्या `वंशवृक्ष`, `पर्व`, `धर्मश्री` व `काठ` या कादंबऱ्या वाचल्या. रंगनाथ पठारे यांचे `सातपाटील कुलवृंतात` व `ताम्रपट` हे पुस्तक वाचले. संपुर्ण कुटूंब घरी असल्याने महिनाभरात कुठलेच लिखाण केले नाही. वाळवणंमध्ये वडे तोडणे, कुरडया उलटणे व बटाट्याचा कीस करत घरकामाचा मनमुराद आनंद घेतला. पत्ते, चंफल व गाण्याच्या भेंड्यात वेळ निघून जातो. सारेच घरी असल्याने जेवणाची पंगत धरत होत असलेल्या जेवणात दोन घास जास्त जात आहे. ``

माणसात आली माणुसकी

कोरोना संसर्गाच्या निमित्ताने बाहेरगावी व परदेशातील मुले घरी आली. दुरावत जाणारं नातं जवळ आल्याने घराला घरपण आले आहे. अनेकांपुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न चिंताजनक आहे. मदतीच्या निमित्ताने हाजारो हात किराणा, भाजीपाला आर्थिक मदत, आरोग्य सेवा देत असल्याने माणुसकीची अनुभूती आली. सोनईत यश मित्रमंडळ रोज दीड हजार गरजूंना घरपोच जेवणाचा डबा देत असल्याची बातमी वाचून मनाला सर्वोच्च आनंद झाला. मुख्यमंत्री सहायता निधीस होत असलेली मदत कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने घासातला घास देवून सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा गडाख यांनी केली.

घराला घरपणाची अनुभूती आली

 "रोज सकाळी उठून चिक्कूच्या बागेत अर्धा तास चालतो. यानंतर सर्व नातवंडांचा मेळा भरतो. गोष्टी, अभ्यास, शालेय पुस्तकांतील कविता होतात. चिमुकल्यांचं रडणं, कुदळणं, मध्येच रुसवा आणि पोरांची क्षणात होणारी कट्टी आणि सोय मनाला खुपच समाधान देत आहे. नेहमी धावपळीत असणारे मुले व पुतणे जवळ बसून राजकारण विरहित गप्पांच्या फडात सहभागी होत असल्याने घराला घरपणाची अनुभूती आली.`` असे गडाख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com