yashwant sinha target bjp | Sarkarnama

भाजप हा मुडद्यांचा पक्ष, यशवंत सिन्हांची बोचरी टीका 

योगीराज प्रभुणे 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे : ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षात सगळेजण घाबरतात. आज भारतीय जनता पक्षातील काहीजण कधीकाळी कॉंग्रेसला "मुडद्यांचा पक्ष' असे म्हणत होते. पण, आज भाजप हाच मुडद्यांचा पक्ष झाला आहे,'' अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी टीका केली. 

""पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर मोदी यांच्या नेतृत्वाला कोणी आव्हान देईल का,' या प्रश्‍नाचे उत्तर देताना सिन्हा म्हणाले, ""मोदींच्या नेतृत्वाला भाजपमधून कोणी आव्हान देणार नाही. हे सगळे घाबरले आहेत.'' 

भाजपच्या कार्यपद्धतीत आगामी सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत खूप मोठा बदल होईल असे दिसत नाही. कारण, बदल करणे हे फक्त भाजपच्या दोन जणांच्या हातात आहे, असे पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता त्यांनी स्पष्ट केले. 

सिन्हा म्हणाले, ""पाच राज्यांच्या निवडणुकीत "योगी कार्ड' चालले नाही. तसेच, समाजात फूट पाडूनही मते मिळविता आली नाहीत. यातून हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपच्या यशांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.'' 

2012 -13 मध्ये तुम्ही विचार केला होता का, की मोदी पंतप्रधान होती. तेही इतक्‍या ताकदीने? त्या वेळी ते तर एका राज्याचे फक्त मुख्यमंत्री होते. मोदींना पर्याय मिळू शकत नाही, इतकी देशाची गुणवत्ता ढासळली आहे? मोदींना पर्यायी उमेदवार जनता निवडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

त्या निवडणुकीत मोदींच्या समोर कोणत्याच नेतृत्वाचे आव्हान नव्हते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे "अनटेस्टेड' होते. प्रादेशिक पातळीवरही नेतृत्व नव्हते. त्यामुळे मोदी पंतप्रधान होऊ शकतात. तर कॉंग्रेस, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, मुलायमसिंह यादव यांच्यासह आणि इतर काहींना पंतप्रधान आता होता येईल, असेही सिन्हा यांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख