जीएसटी म्हणजे आर्थिक दहशतवादच : यशवंत सिन्हा

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचेच हाल झालेले आहेत. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांसह गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना या करप्रणालीला आर्थिक दहशतवाद म्हणत होतो. परंतु, आता सरकारने आणलेला जीएसटी हा आर्थिक दहशतवाद असल्याची टीका का भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थ व परराष्ट्र मंत्री यांनी येथे केली.
जीएसटी म्हणजे आर्थिक दहशतवादच : यशवंत सिन्हा

अकोला : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचेच हाल झालेले आहेत. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांसह गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना या करप्रणालीला आर्थिक दहशतवाद म्हणत होतो. परंतु, आता सरकारने आणलेला जीएसटी हा आर्थिक दहशतवाद असल्याची टीका का भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थ व परराष्ट्र मंत्री यांनी येथे केली.

''देशभरातील शेतकऱ्यांना समस्यांपासून संपूर्ण मुक्ती हवी आहे. आता ते थांबायला तयार नाहीत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस अशा सर्वच पिकांचे भाव कोसळले आहेत. नाफेडद्वारे हमीभावाने केवळ एकरी दोन क्विंटल शेतमाल खरेदी केला जात आहे. नाफेडने हे धोरण बदलून शेतकऱ्यांचा सर्वच शेतीमाल खरेदी न केल्यास अकोल्यातून देशव्यापी लढा उभारून स्वतः या लढात सहभागी होईन,'' असा इशारा यशवंत सिन्हा यांनी आज नाफेड व शासनाला दिला.

शेतकरी जागर मंचाने अकोल्यात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे 'भारतीय अर्थव्यवस्था, नोटबंदी' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी बोलताना सिन्हा यांनी देशात नोटाबंदी फसल्याचे स्पष्ट करीत फसलेल्या गोष्टींवर चर्चा होत नसते, असे सूचक वक्तव्य करून पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले.

यशवंत सिन्हा सुरुवातीला म्हणाले, "सप्टेंबर महिन्यात मी एका इंग्रजी वर्तमानपत्रात केवळ 1200 शब्दांचा एक लेख लिहीला आणि देशभरात वेगळे वातावरण तयार झाले. या लेखात मांडलेली मते ही देशातील सर्व जनतेच्या मनातील असल्याने मला सर्वत्र अनुकूल असे संदेश मिळू लागले. सध्या देशातील शेतकरी अडचणीत आहेत. आपण ज्या झाडखंडमधून येतो त्या प्रदेशात पुर्वी शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. आता तेथे आत्महत्या होत अाहेत. विदर्भ तर देशातच नव्हे, तर जगात शेतकरी आत्महत्यांसाठी अोळखला जाणारा प्रदेश बनलेला आहे. गेल्या 70 वर्षात आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो नाही. याला सर्वजण जबाबदार आहेत. सध्या या देशातील शेतकरी, व्यापारी, तरुण, कष्टकरी असे सर्वजण विविध अडचणींना सामोरे जात आहेत,'' त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करून कुठलेही सरकार चालविले जाऊ शकत नाही. उलट त्या समस्या सोडविणारे शासन चांगले समजले जाते, असा अप्रत्यक्ष टोला आपल्याच पक्षाच्या सरकारला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी लगावला.

जीएसटी कायदा झाल्यापासून छोटे-मोठेव्यापारी, उद्योजक समस्या ग्रस्त झाले आहेत. दबाव वाढल्याने आता सरकारने काही बदल केले. मात्र ते सुद्धा सदोष असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीश मुरुमकार होते. यावेळी व्यासपिठावर शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, प्रशांत गावंडे, यशवंत सिन्हा यांच्या पत्नी निलीमा सिन्हा व इतर उपस्थित होते. प्रशांत गावंडे यांनी प्रास्ताविकात शेतकरी जागर मंचाची भूमिका मांडली.

नोटाबंदी फसली
सरकारने गेल्या काळात केलेली नोटाबंदी पुर्णपणे फसली. त्याबाबत काय बोलायचे, असा प्रश्न उपस्थित करत सिन्हा म्हणाले, ''नोटाबंदीचे परिणाम वाईट आहेत. सर्वच जण त्यात भरडले गेले आहेत. केवळ आकडेवारी दाखवून देशातील समस्या सुटणार नाहीत. जीएसटी लावण्यापुर्वी व नंतर एवढी विक्री झाली असे म्हणणे योग्य होत नाही.'' उलट उत्पादन किती झाले त्यावर तुम्ही विकासाची चर्चा करू शकता, असे सांगत सिन्हा म्हणाले, ''विरोधात असताना अाम्हीच सरकारच्या करविषयक धोरणांवर टीका करीत होतो. आजची परिस्थिती पाहली तर याबद्ल बोलायला शब्दच नाहीत.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com