यशवंत सिन्हांनी केली मोदींची तुघलकाशी तुलना

माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात चढविला. मोदी यांच्या गृहराज्यातच यशवंत सिन्हा यांनी बुधवारी, 14व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मुहंमद बिन तुघलकनेही 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी लादली होती, असा हल्ला चढविला.
यशवंत सिन्हांनी केली मोदींची तुघलकाशी तुलना

अहमदाबाद : माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात चढविला. मोदी यांच्या गृहराज्यातच यशवंत सिन्हा यांनी बुधवारी, 14व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मुहंमद बिन तुघलकनेही 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी लादली होती, असा हल्ला चढविला.

नोटाबंदीच्या वादग्रस्त निर्णयासाठी मोदींवर टीका करताना सिन्हा यांनी येथील एका कार्यक्रमात, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला 3.75 कोटी रूपयांचा फटका बसल्याचा दावा केला. अनेक राजांनी आपआपल्या मुद्रा निर्माण केल्या. काही राजांनी नव्या मुद्रांचे चलन आणताना जुने चलनही वापरात ठेवले. परंतु, नवे चलन आणून जुने चलन बंद करणारा तुघलक हा एकमेव सुलतान होता. 700 वर्षांपूर्वीच नोटाबंदी झाली होती, असे आपण म्हणू शकतो. आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलविण्यासाठी कुख्यात असलेल्या तुघलकने नोटाबंदीही केली होती, असे सिन्हा म्हणाले.
 
सिन्हा यांनी यावेळी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याचीही मागणी केली. अर्थमंत्र्यांनी जीएसटीकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर देशातील अराजकता थांबविली जाऊ शकली असती. पण दोषपूर्ण जीएसटी लागू करूनही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगतानाच, गुजरातच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले जेटली हे गुजरातवरचे ओझे आहे. त्यांचा राजीनामा मागणे हा या देशातील जनतेचा अधिकारच आहे, असेही सिन्हा यांनी ठणकावून सांगितले.

लोकशाही बचाव अभियान
नोटाबंदी आणि वस्तू-सेवा कराच्या (जीएसटी) दृष्टिकोनातून लोकशाही बचाव अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सिन्हा यांनी कार्यकर्त्यांच्या गटांना केले. बेरोजगारी ही देशाची सर्वात मोठी समस्या असल्याचा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com