"यशवंत' कारखान्यासाठी सरकार शोधतयं भाडेकरू 

"यशवंत' कारखान्यासाठी सरकार शोधतयं भाडेकरू 

पुणे : यशवंत कारखान्याची जमीन विकण्यासाठी हितंसंबंधियांनी अडचणी निर्माण केल्यानेच हा कारखाना सुरू होऊ शकलेला नाही. मात्र अशा हितसंबंधीयांच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हा कारखाना हा दीर्घ मुदतीने भाड्याने देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली. 

ते म्हणाले,""याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट, सहकार सचिव, साखर आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक होणार आहे. त्यामुळे हा कारखाना सुरू होईल, याची खात्री वाटते.'' 

""मी 2014 मध्ये आमदार झाल्यापासून कारखाना सुरू करण्यासाठी नेटाने प्रयत्न केले. कारखान्याची जमीन विक्रिला काढण्यासाठी सभासदांचे सहकार्य मिळाले. त्यांनी तशी परवानगी दिली. इतकी मोक्‍याची जागा असूनही ती जमीन विकली जाऊ शकली नाही. या मागे काही हितसंबंधी शक्ती कार्यरत होत्या. त्यांना हा कारखाना सुरू होऊ द्यायचा नाही. जमीन खरेदीसाठी ग्राहक आले की त्यांना नको ती कारणे सांगून पिटाळून लावण्याचा उद्योग या हितसंबंधियांनी केला, असा आरोप त्यांनी केला. 

ते म्हणाले, ""आता नवीन प्रशासक येथे नेमण्यात येईल. कारखाना "लॉंग लीज'वर भाड्याने देण्यात येईल. डिस्टलरीही सुरू केली जाईल. त्यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. कारखाना भाड्याने दिला तरी येथील जमिनीवर इतर काही ऍक्‍टिव्हिटी सुरू करता येतील का, याचीही चाचपणी केली जात आहे. कारखान्या जवळूनच रिंग रोड जाणार आहे. याशिवाय अष्टविनायक मार्गाचेही काम प्रगति पथावर आहे. त्यामुळे पुढील काळात येथील जमिनीला मोठा भाव येणार आहे. त्यामुळे कारखान्याची जमीन आता विकण्याची गरज वाटत नाही. कारखाना भाड्याने द्यायचा, हाच पर्याय उत्तम ठरेल.'' 

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या भीमा कारखान्यासाठी निधी आणला. यशवंत 
कारखान्याला असा निधी का मिळू शकला नाही, या प्रश्‍नावर ते म्हणाले,""भीमा कारखाना केवळ एकच हंगाम बंद होता. तो कारखाना चालू अवस्थेत आहे. या उलट यशवंत कारखाना हा बरीच वर्षे बंद आहे. कारखान्याचे अकौंट हे "एनपीए'त गेले आहे. अनेक सरकारी विभागाच्या करांची थकबाकी आहे. त्यामुळे या कारखान्यासाठी कोणतीच आर्थिक साह्य योजना मंजूर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच कारखाना आता दीर्घ मुदतीने भाड्याने देण्याचा पर्याय पुढे आला आहे. या पर्यायावर सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे कारखाना लवकरच सुरू होण्याच्या दृष्टीने पावले पडली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com