मी सहा फुटी अमिताभ (गडाख) अन्‌ जया (शारदा) पाच फुटी ! 

मी सहा फुटी अमिताभ (गडाख) अन्‌ जया (शारदा) पाच फुटी ! 

नगर ः ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात लग्नाची गोष्ट आणि गमतीजमती सांगून उपस्थितांना प्रफुल्लीत केले. लग्नाची गोष्ट सांगताना मी असा सहा फूट चार इंचाचा अमिताभ बच्चन आणि पत्नी शारदा पाच फुटी जया भादुरी, अशी उपमा देऊन त्यांनी नातेवाईकांना हसविले. निमित्त होते गडाख यांच्या सोनई येथे परिवाराकडून सत्कार सोहळ्याचे. 


यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून होत आहे. 22 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला काल सोनई येथे गडाख यांचा परिवारात सत्कार सोहळा रंगला. या वेळी त्यांनी गडाख आडनावाचा इतिहासही सांगितला. 

माझ्या राजकीय आणि कौटुंबिक उंचीची खरी मानकरी माझी पत्नीच आहे. घरात स्वास्थ्य आणि संस्कारांची पेरणी व्यवस्थित झालानेच आज हे यश मिळाले आहे, असे सांगून आपल्या यशाचे सर्व श्रेय त्यांनी पत्नीला दिले. 

गडाख आडनावाचा इतिहास सांगताना ते म्हणाले, आमचे पूर्वज राजस्थानात राहात होते. भटकंती करीत ते झाशी व नंतर माहूरगडला आले. पूर्वी आमचे आडनाव गवळी होते. मात्र एक गड जिंकण्यात गवळी लोकांचा मोठा वाटा होता. त्यामुळे आम्ही गडकरी झालो. पुढे गडकरीचे गडाख झालो. त्या काळी एका राजाने आमच्या पूर्वजांना सोनई गावची पाटीलकी दिली. 

पक्षाचा नव्हे, गावचा सोहळा 
माजी आमदार शंकरराव गडाख हे शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नेते आहेत. स्थानिक निवडणुकांत राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्षावर मात करीत गडाख कुटुंबियांनी चांगल्या जागा मिळविल्या आहेत. सोनईतील त्यांचा दबदबा पाहता पक्षापेक्षा वैयक्तिक गडाख कुटुंबियांना मानणारे अनेक कुटुंबे आहेत. आगामी विधानसभेची तयारी म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.

मतदारसंघातील 26 हजार कुटुंबांमध्ये कार्यक्रमाच्या पत्रिका पोचवून गडाख कुटुंबियांनी सर्वांना आपलेशे करून घेतले आहे. यशवंतराव गडाख यांना माननारे सर्वपक्षीय नेते आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या कार्यक्रमांना सर्वच पक्षातील नेत्यांची उपस्थिती राहिल. सर्वांना समावून घेण्यासाठी हा सोहला पक्षाचा नव्हे, तर गावचा होण्यावर शंकरराव गडाख यांनी भर दिला आहे. 

सोनई गाव नटले 
गडाख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोनई गाव नटले आहे. गावात ठिकठिकाणी सडा रांगोळी काढल्या आहेत. चार दिवस रोज वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.

सोनई (ता. नेवासे) येथील मुळा पब्लिकस्कुलच्या प्रांगणात उद्या (ता. 19) राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व साहित्य प्रदर्शन, 75 हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा प्रारंभ सकाळी दहा वाजता होणार आहे. तसेच हिंदी कवी संमेलन नगरच्या यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात सायंकाळी पाच वाजता होईल. शनिवारी (ता. 20) भजनसंध्या कार्यक्रम बद्रीनाथ तनपुरे महाराजांच्या उपस्थितीत होईल.

रविवारी (ता. 21) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, साहित्यिक ना. धों. महानोर, रामदास फुटाणे यांचा कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 2) सांस्कृतिक कार्यक्रम होईल. हे सर्व कार्यक्रम सोनई येथे होणार आहेत. त्याची जोरदार तयारी माजी आमदार शंकरराव गडाख, यशवंत प्रतिष्ठानचे प्रशांत गडाख यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com