महापौर महाडेश्‍वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा:  यशोमती ठाकूर 

..
Mahadeshwar-Thakur
Mahadeshwar-Thakur

मुंबई  : महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गाऱ्हाणे सांगणाऱ्या मुलीचा हात धरून धमकी दिल्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यांना सत्तेचा माज चढल्याचे हे लक्षण आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केली. 

महाडेश्‍वर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले होते. त्याकडे लक्ष देण्यास महापालिकेला वेळ नाही. महापौर लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे औदार्यही दाखवू शकत नाहीत, असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.

 सांताक्रूझमधील पटेलनगरमध्ये विजेचा शॉक लागून आई व मुलाचा मृत्यू झाला. या घटनेची तातडीने दखल न घेता दुसऱ्या दिवशी पटेलनगरमध्ये आलेल्या महापौरांना संतप्त रहिवाशांनी घेराव घालून जाब विचारला. त्या वेळी जाब विचारणाऱ्या एका मुलीचा हात पकडून महापौर महाडेश्‍वर यांनी तिला दमबाजी केली, हे अशोभनीय आहे, अशी टीका त्यांनी केली.

महिलांचा आदर करण्याचे साधे तारतम्यही शिवसेनेच्या या महापौरांकडे नाही, समस्या ऐकून घेण्याची सहनशीलता नाही. अशा महापौरांवर कारवाई करण्याची गरज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बेजबाबदार व उद्धट महापौरांवर काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com