आमदार यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी शेखावत-सुर्यवंशी यांची मोर्चेबांधणी?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सहा महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि आतापासूनच कॉंग्रेसच्या तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे एका व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे.
आमदार यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी शेखावत-सुर्यवंशी यांची मोर्चेबांधणी?

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सहा महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि आतापासूनच कॉंग्रेसच्या तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे एका व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे.

अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये शेखावत आणि सुर्यवंशी हे दोघे यशोमती ठाकूर यांना येत्या निवडणुकीत पराभूत करण्यासंदर्भात चर्चा करीत आहेत. त्यासाठी `पाच कोटी रुपये लागतील', असेही संभाषण या दोन नेत्यांमध्ये झाले आहे. हे संभाषण रावसाहेब शेखावत आणि दिनेश सुर्यवंशी यांच्यातील असल्याचा दावा आमदार यशोमती ठाकूर यांनी `सरकारनामा'शी बोलताना केला. या प्रकारामुळे अमरावती जिल्याचे राजकारण
ढवळून निघाले आहे.

यशोमती ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रावसाहेब शेखावत व दिनेश सुर्यवंशी यांच्यात फोनवरून बोलणी झाली. यात फोन कॉलमध्ये `तुम्ही आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून तिकीट कन्फर्म करा. पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याशी पण बोला,' असे रावसाहेब शेखावत यांनी कॉलवर म्हटले आहे. 

``देशाच्या माजी राष्ट्रपतींचा मुलगा, कॉंग्रेसचाच माजी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष मला हरविण्यासाठी पाच कोटी रुपये जुळविण्यासंदर्भात चर्चा करतात, हे धक्कादायक आहे,'' असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

यशोमती ठाकूर या गेल्या दहा वर्षांपासून तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या आमदार आहेत. मध्यतंरी त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीची सचिवपदाची जबाबदारी पक्षाने दिली होती. मेघालय व कर्नाटक राज्याच्या निवडणूक प्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com